कृषि विज्ञान केंद्र बुलढाणा येथे “कृषि क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर” या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची सभा संपन्न

IMG-20250917-WA0024


बुलढाणा (एकनाथ माळेकर)१६ सप्टेंबर २०२५ रोजी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे “कृषि क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर” या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले तसेच कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा अंतर्गत असलेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची सभा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, डॉ. दिनेश कानोडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा, डॉ. आशुतोष लाटकर, शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा, डॉ. प्रशांत खांडे, COO FASAL (Forecasting Agricultural Output using Space-based, Agro-meteorology and Land-based Observations), श्री. धनंजय झिंगे, डायरेक्टर, डीजी क्रोप वेदर स्टेशन, डॉ. दुर्गेश वेले, डायरेक्टर, भूमी स्कॅन टेकनॉलोंजी, तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य आणि जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि कृषि विज्ञान केंद्राचे, डॉ. जगदीश वाडकर शास्त्रज्ञ (कृषि विस्तार) आणि डॉ. सुकेशनी वाणे शास्त्रज्ञ (कृषि अभियांत्रिकी), कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा हे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांनी प्रशिक्षणाचे व सभेचे प्रास्ताविक केले. प्रशांत खांडे, COO FASAL यांनी कृषि क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. धनंजय झिंगे, डायरेक्टर, डीजी क्रोप वेदर स्टेशन यांनी हवामान, माती, ओलावा, पीक या माहितीच्या आधारे कृषी सल्ला सांगणारे यंत्र दाखवून माहिती दिली. डॉ. दुर्गेश वेले, डायरेक्टर, भूमी स्कॅन टेकनॉलॉजी, यांनी त्वरित माती तपासणा-या यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले व त्याबाबत माहिती सांगितली. उपस्थित सर्व शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य व प्रगतीशील शेतकरी यांनी AI तंत्रज्ञान विषयावर सकारात्मक चर्चा केली. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात सर्व उपस्थित शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य यांनी पुढील वाटचाली साठी चर्चा केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुकेशनी वाणे शास्त्रज्ञ (कृषि अभियांत्रिकी), कृषि विज्ञान केंद्र बुलढाणा केले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ येवले, विजय भुतेकर,अजय देशमुख, हरिभाऊ सिनकर, नंदकिशोर टाले,भारत टाले, पवन साठे,किशोर सपकाळ, आनंद लहाने, भारत परिहार, लखाडे पाटील, प्रकाश सपकाळ, विष्णु गाडेकर इत्यादी ५० प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!