मेरा बु परिसरातील जोड रस्त्याची दयनीय अवस्था रस्ते सुधारण्याची मेरा बु येथील ग्रामस्थ यांची मागणी सिंदखेराजा आमदार यांना निवेदन

IMG-20250917-WA0001

चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु चिखली तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या गावाला जोडणारी अनेक रस्ते खराब झाले आहे या गावाची मेरा बु शेजारील खेड्यापाड्यातील लोकांचा बाजारपेठ तसेच शालेय विद्यार्थ्यांचा जवळून संबंध येतो परंतु सदर रस्ते ही खराब झाल्यामुळे मेरा बु येथे येण्या जाण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तसेच विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून येणे जाणे करावे लागत आहे मेरा बु ही चिखली तालुक्यात असून हे गाव सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये येत आहे त्यामुळे चिखली येथील आमदार महोदय यांचे माहेर गाव असल्यामुळे त्यांचे सुद्धा या गावाकडे लक्ष आहे परंतु ते या गावासाठी निधी खर्च करू शकत नाही त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांच्याकडे मेरा बु येथील सरपंच सुनील पडघान अशोक सिताराम पडघान अनिल पडघान प्रवीण पडघन राजूभाऊ सावंत मोहन पडघान अनंत पडघान शुभम पडघान यांनी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मेरा बुद्रुक या गावाला जोडणारे रस्ते संबंधित निवेदन देवून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली आहे मेरा बु ते सावखेड मेरा बु ते मेरा खु मेरा बु ते असोला मेरा बुद्रुक ते कोलारा मेरा बुद्रुक ते पिंपळगाव सोनारा मेरा बुद्रुक ते अंबाशी रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी मेरा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहे या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग देळगाव राजा यांनी पूर्ण पणे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावरून जरी महसूल विभागाची रेतीबंद असली तरी चोरट्या मार्गाने रेतीचे ओव्हरलोड वाहणे भरधाव वेगाने याभागातुन धावत आहे त्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय होत असल्याचे जनतेमध्ये चर्चा आहे

You may have missed

error: Content is protected !!