सौर कृषी वाहिनी प्रकल्प स्थलांतरीत करण्यासाठी किनगांव राजा ग्रामस्थांचा आमरण उपोषणाला सुरुवातप्रकल्पाला विरोध नसल्याची स्पष्ट केली भूमिका….
सिदखेडराजा( अनिल दराडे )
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा गांवामध्ये होवू घातलेला मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी स्थलांतरीत करण्यासाठी ग्रामस्थांनी ता.१५ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला सुरवात करण्यात आली. शासकीय जमीन गट क्र.५२५ मर्धील एच-क्लास जागेवर सौर कृषी वाहिनी प्रकल्प नियोजित असुन सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला स्थानीक नागरिकांचा विरोध नसुन फक्त जागा स्थलांतरीत करण्याच्या मागणी तसेच फुले नगर येथे ग्रामपंचायत नमुना आठ अ मधील सरकार ही नोंद कमी करून मालक म्हणून संबंधित नागरीकांचे नावे लावण्यात यावे,फुले नगर येथील पात्र घरकुल लाभार्थ्यांना त्यांच ठिकाणी घरकुलांचा लाभ देण्यात यावा यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले.या संदर्भामध्ये प्रशासनाला लेखी तक्रार देण्यात आली होती परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.फुले नगर येथील वस्ती मध्ये मागील ५० ते ६० वर्षापासून नागरीक वास्तव करतात,परंतु अद्यापही नागरिकांना स्वतःच्या जागा नावावर करण्यात आलेली नाही.सदर शासकीय जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली होती सदर वृक्षांची जेसीबीच्या सहाय्याने वृक्षतोड करण्यात आली आहे.सौर कृषी वाहिनी प्रकल्प मानवी वस्तीस लागून असल्यामुळे भविष्यात मानव कल्याणाच्या योजना राबविण्यास योग्य असुन शासकीय कार्यालय किंवा इतर सार्वजनिक योजना राबवण्यासाठी सदरचे क्षेत्र योग्य आहे.प्रकल्पाला नागरिकांचा विरोध नसून फक्त तो इतर शासकीय जमिनीवर स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.उपोषणाला शिवाजीराव काळुसे,मधुकर साळवे,प्रसाद कुलकर्णी,दीपक साळवे, ज्ञानेश्वर कायंदे,सचिन मांटे,वसंता साळवे,सर्जेराव गोरे, दत्तात्रय साळवे,यांच्यासह आदी नागरीक उपोषणाला बसले आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सीमा काळुसे विद्या साळवे,रंजना साळवे,गणेश काकड,सुनील जाधव, राजेंद्र राजे जाधव,अमोल साळवे,पुजाराम साळवे,रामेश्वर काकड,गणेश बनाईतकर,शिवाजी काकड,समाधान मुंढे, गजानन गवारे यांच्यासह शेकडो नागरीकांनी उपोषण स्थळाला भेट देवुन पाठींबा दिला आहे.
…बॉक्स…
सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला विरोध नसाल्यांचा ग्रामस्थांची भूमिका :
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला स्थानिक नागरीकांचा विरोध नसुन फक्त शासकीय गट क्रमांक ५२५ मध्ये लगत लोकवस्ती असल्यामुळे सदर च्या सौर कृषी वाहिनी प्रकल्प पर्यायी शासकीय जमीन गट नंबर ६२३ मध्ये १३.३४ हेक्टर जमीन उपलब्ध असून त्याठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
