दत्तापूरला 19 ला ऑन द स्पॉट विविध प्रमाणपत्राचे वाटप!निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार यांची माहिती

IMG-20250918-WA0002

सिंदखेडराजा (अनिल दराडे) राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” व “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत सिंधखेडराजा तालुक्यातील दत्तापूर येथे 19 सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत ऑन द स्पॉट विविध दाखल्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार यांनी दिली, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे

या उपक्रमाची माहिती देताना निवासी नायब तहसीलदार डॉ. प्रांजल पवार म्हणाल्या, “भटक्या व विमुक्त समाजातील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी अनेकदा कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आम्ही थेट त्यांच्या गावी जाऊन प्रमाणपत्र वाटप करणार आहोत. त्यामुळे ही एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.”

सदर विशेष कॅम्पचे आयोजन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच तहसीलदार अजित दिवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.

या दिवशी नागरिकांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार यांनी केले आहे

You may have missed

error: Content is protected !!