अवैध गुटख्याविरोधात बुलढाणा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई,५ लाख २१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त….

Screenshot_2025-09-18-16-26-02-75_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज)बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने साखळी फाटा येथे सव्वा पाच लाखांचा गुटखा जप्त केला आहे बुलढाणा- चिखली महामार्गावरील साखळी बु. फाटा येथे १५. सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अवैध गुटखा घेऊन जाणार्‍या वाहनातून ५ लाख २१ हजार १७० रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये आरोपी गजानन देविदास पेहरे रा. वरुड बु. ता. जाफ्राबाद व चालक सुनिल रामराव वाघ रा. अमोना ता. चिखली यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी जवळ असलेल्या वाहनातून वाहनातून ४५ पोतड्या प्रत्येक पोतडीमध्ये २५ नग राज निवास सुगंधित पान मसाला पाकीट असे एकुण किंमत २ लाख २५ हजार रूपये, ५ पोतड्या प्रत्येक पोतडीमध्ये प्रीमियम आर एन जाफरानी जर्दा तंबाखु २२५ पाकीटे किंमत ५६ हजार २५० रुपये, १० पांढर्‍या बॅग, प्रत्येक बॅगमध्ये २० पाकीटे केसर युक्त विमल पान मसाला किंमत ९४ हजार रूपये, पांढर्‍या रंगाच्या २ पोतडयामध्य बिग १० पांढर्‍या पोतडीमध्ये केसर किंमत ४३ हजार ५६० रुपये, तंबाखू ६ हजार रूपये, युक्त विमल पान मसाला १० बॅग मध्ये तंबाखू किंमत ४ हजार ८४० रुपये, खाकी रंगाचे २ पोत्यामध्ये ८ पांढर्या रंगाच्या पोतड्या ज्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाला ४१६ लहान आकाराची पाकीटे किंमत ७७ हजार ७९२ रुपये, पांढर्‍या रंगाच्या २ पोतडयामध्ये किंमत १३ हजार ७२८ रुपये असा एकुण सुगंधीत सुपारी व तंबाकुचा एकुण किंमत ५ लाख २१ हजार १७० रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच सदरचा माल बाहुन नेण्यासाठी वापरलेलं मालवाहू वाहन एमएच २८ बीबी ७०२५ किंमत ४ लाख ५० हजार रुपये असा एकुण ९ लाख ७१ हजार १७० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला आहे. आरोपीं विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरेश मोरे, पोहेकॉ. कैलास उगले, महादेव इंगळे, नारायण गावंडे, विकास सोनुने, पोकॉ. गजानन राजपूत, विष्णू गिते, ज्ञानेश्वर शेळके यांनी केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!