मलकापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार कंटेनरवर आदळळी;४ जण ठार

Screenshot_2025-09-18-16-02-36-56_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

मलकापूर ( बुलढाणा माझा न्युज)मलकापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर सकाळी चार वाजेच्या सुमारास
ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर घडली.
या अपघातामध्ये कारमधील चौघांचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये कार चालकाचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला.सविस्तर वृत्त असे की मलकापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर पहाटे ४ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुक्ताईनगरकडून मलकापूरच्या दिशेला जात असताना भुसावळवरून मलकापूरच्या दिशेला जाणाऱ्या कारने ट्रेलरला धडक दिली. चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार ट्रेलरला जाऊन धडकली. मृतांमध्ये एक पुरूष आणि ३ महिलांचा समावेश आहे.

या अपघातामध्ये कारचालक साजिद अजीज बागवान यांच्यासह ३ महिला महिला असे एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण कारने प्रवास करत होते. चालक साजिदचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. अपघातामध्ये चालकासह चौघांचा मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६ [१], १२५ [बी ], मोटार वाहन कायद्याच्या सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

You may have missed

error: Content is protected !!