सत्कार त्यांचेच होतात जे आपल्या कर्तुत्वाने मोठे होतात अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी प्रशस्तीपत्र देऊन केला सत्कार
दे/राजा एकनाथ माळेकर. दे/राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार रुपेश शक्करगे हे आपल्या कामाच्या पद्धतीने अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या कामाचे वेगळे छाप पडत आहे अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये आताच गणेशोत्सव ईद व विविध इतरही उत्सव त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि प्रत्येक गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील तसेच नवयुवक मित्र मंडळ यांच्या सहकार्याने संपूर्ण गणेश उत्सव व इद आपल्या अंढेरा पोलीस स्टेशन हदी मध्ये शांततेत पार पाडल्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी त्यांना प्रशिस्त पत्रक देऊन सत्कार केला आहे अंढेरा पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सव दरम्यान अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी जी नवयुवकासाठी स्पर्धा परीक्षा घेतली होती ती सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्चेचा विषय झाला आहे आज शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सर्व जनतेला त्यामधून संदेश दिला आहे आणि अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येक गावातील सुशिक्षित युवक हा त्यांचा एक खूप मोठा चाहता वर्ग आहे प्रत्येक गावामध्ये त्यांनी शालेय विद्यार्थ्यां सोबत चांगले संमध ठेवले आहे विद्यार्थी विषयी तळमळ आहे आणि ते त्याविषयी विद्यार्थी यांना मार्गदर्शनही करतात त्यामुळे प्रत्येक गावामध्ये त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग झाला आहे शिक्षणाविषयी तळमळ असणारे अधिकारी म्हणून त्यांची अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण होत आहे बुलढाणा येथील एलसीबी ऑफिस मध्ये एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्याला या आदीच ओळख होती त्याच धर्तीवर त्यांनी अंढेरा पोलीस स्टेशन येथे काम चालू ठेवले आहे त्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी त्यांना प्रशस्त पत्र देऊन सत्कार केला आहे
