अंढेरा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई,चोरीस गेलेल्या तीन बॅटऱ्यासह आरोपी अटक….
दे/राजा( एकनाथ माळेकर )
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये दिग्रस येथील ट्रॅक्टर व टिप्पर मधून तीन बॅटरी चोरीगेल्या होत्या याची तक्रार अंढेरा पोलीस स्टेशनला दिग्रस येथील तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद मांटे आणि अनंता मांटे यांनी दिली होती या तक्रारीची दखल घेत अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत डिग्रस येथील ट्रॅक्टर व टिप्परमधून चोरी गेलेल्या तीन बॅटरींचा उलगडा करून आरोपीला अटक केली आहे. १७ सप्टेंबरच्या रात्री तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद मांटे आणि अनंता मांटे यांच्या ट्रॅक्टरमधील दोन बॅटरी तसेच मनीष वाघ यांच्या टिप्परमधील एक बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. प्रल्हाद मांटे यांनी १८ सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. गोपनीय माहितीच्या आधारे, १९ सप्टेंबर रोजी गणेश भिकाजी हुसे (रा. डिग्रस, ता. देऊळगाव राजा) यास चोरीस गेलेल्या बॅटरींसह पकडले. पंचासमक्ष तपासात तीनही बॅटरी जप्त करून त्याला अटक करण्यात आली.सदरची कामगिरी मा.श्री निलेश तांबे सा पोलीस अधिक्षक बुलढाणा,मा.श्री अमोल गायकवाड सा अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा मा.श्रीमती मनिषा कदम मॅडम SDPO देऊळगाव राजा यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही पथक पोलीस स्टेशन अढेरा चे प्रभारी अधिकारी सपोनि रुपेश शक्करगे,पोउपनि सुरेश जारवाल पोह/554 सोनकांबळे पोह/49 मारोती कायंदे पोशि/2577 नेमाने पोशि/2604 नितीन फुसे पोशि/2311 अमोल रोरे यांनी केली.
