हिवरा आश्रमात ‘नारीशक्ती’चा कौतुकास्पद उपक्रम – अनाथ मुलांसाठी सेवा व भेटवस्तू

IMG-20250920-WA0007

लोणार (यासीन शेख):दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी (रविवार) ‘नारीशक्ती’च्या कार्यकर्त्यांनी परमपूज्य शुकदासजी महाराजांच्या पावन भूमी हिवरा आश्रमाला भेट देत समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रम राबवला.महाराजांच्या आश्रमात कार्यरत श्री मालपाणी सरांना श्रीफळ अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. माननीय सरांच्या वतीने व्यवस्थापन पाहणारे दयानंद थोरात सर यांनी ‘नारीशक्ती’च्या टीममधील महिलांना प.पू. शुकदास महाराज यांच्या जीवनगौरव पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. आस्थेने विचारपूस करून सहृदय पाहुणचार केला. सन्मानित कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

नारीशक्तीच्या कार्यात योगदान देणाऱ्या खाती प्रताप शेजूळ यांना आणि प.पू. शुकदास महाराज यांच्या सहकर्मी दादासाहेब मानघाले यांनाही आशिर्वाद देण्यात आले.

यानंतर ‘नारीशक्ती’च्या वतीने नित्यानंद सेवा आश्रम (अनंत शेळके सर संचलित) येथे ६० अनाथ मुलांना भेट देण्यात आली. फार कष्टाचा प्रवास करून उभारलेल्या या आश्रमाला ५० डझन नोटबुक्स, कपडे, विविध पोष्टीक आहार, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट, चिक्की यांचा मेजवानी स्वरूपात पुरवठा करण्यात आला. तसेच अन्नदानासाठी रोख रक्कम देऊन दिवसभर मुलांच्या सहवासात वेळ घालवला. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून महिलांनाही समाधान व भावनिक आनंद मिळाला.
समाजातील महिलांनी अशा पद्धतीचे उपक्रम अधिकाधिक राबवावेत असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
या उपक्रमाच्या प्रेरणास्त्रोत नारीशक्तीच्या अध्यक्षा सौ. स्मिता विक्रांत मापारी असून त्यांच्या या प्रेरणेने झपाटलेल्या जाणीवेने पुढील कार्यकर्त्या उत्स्फूर्त सहभागी झाल्या सुनीता मापारी , प्रतिक्षा सरकडे, वैशाली देशमुख,पुजा राठोड, संगीता मापारी , वैष्णवी मापारी,वृषालीचौधरी,उर्मिला विभुते,ज्योती मापारी,
नम्रता बाहेती,कविता काळुसे,नंदा संचेती,डाॅ. सोनाली मुंदडा,विजया बियाणी,शोभा राका,सीमा वराडे,डॉ. राजलक्ष्मी बगडीया,जयश्री उंबरकर,निकिता मापारी, ममता ठोसर,विशाखा इंगळे,सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून हिवरा आश्रमातील अनाथ मुलांना एक दिवसाचा आनंद, आवश्यक साहित्य व प्रेमळ सहवास लाभला. समाजसेवेच्या या उपक्रमाचे स्थानिकांनीही कौतुक केले.

You may have missed

error: Content is protected !!