मा. आमदार श्री. तोतारामजी कायंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त दुसरबीड येथे राबविण्यात आले विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर

IMG-20250921-WA0009

सिंदखेडराजा (अनिल दराडे)
आज जिजाऊ इंटरनॅशनल स्कुल दुसरबीड येथे भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक तथा मा. आमदार तोतारामजी कायंदे सर यांच्या ७९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्री दशरथजी शिंदे सर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे तथा वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजेश वाघ सर, डॉ. सिद्धेश्वर मोगल सर, डॉ. मीना तारे मॅडम, डॉ. शुभम नागरे सर, डॉ. संदीप खराटे सर, डॉ. सुनिल शेरे सर आदि उपस्थित होते.

तसेच डॉ. दशरथजी शिंदे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य हे चांगले रहावे म्हणून मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे विद्यार्थ्यांना पटवून दिले व दररोज स्वच्छ रहावे आणि व्यायाम करावा असे आवाहन केले.
तर याप्रसंगी उपस्थित असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी केली व विद्यार्थ्यांना उपचारात्मक ॵषधी दिली.
तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हिना शेख मॅडम यांनी केले. तर शाळेचे मुख्याध्यापक श्री पि. एस. खार्डे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

You may have missed

error: Content is protected !!