पन्नास शेतकऱ्यांच्या तक्रारीची झाले निराकरण……
चिखली (निलेश कोल्हे ) चिखली तहसीलच्या माध्यमातून सेवा पंधरवाडा व छत्रपती शिवाजी महाराज राजस्व महाअभियान अंतर्गत मौजे पांढरदेव येथील पन्नास शेतकऱ्यांच्या पांधन रस्त्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले.१७ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार कार्यालय, चिखली येथे सुनील शिवाजी म्हस्के, विलास रामदास म्हस्के, पंजाबराव निंबाजी म्हस्के, शरद संपत म्हस्के, सुखदेव फकिरा साळवे, हरीश म्हस्के यांनी तहसीलदार काकडे साहेब यांना भेट देऊन दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शेत रस्त्यासाठी मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार संतोष काकडे यांनी नायब तहसीलदार हरी विर यांना तत्काळ निर्देश देऊन मोका पाहणी करून जागेवर रस्ता उपलब्ध करणे व निकाल देणे करिता यावेळी निर्देश देण्यात आले. त्यानुसार नायब तहसीलदार श्री. वीर साहेब यांनी पांढरदेव येथे 19 सप्टेंबर रोजी मोका पाहणी करून तत्काळ शेतरस्ता उपलब्ध करून दिला व शेतकऱ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पांधन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये मोठा आनंद व्यक्त करण्यात आला असून शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. लवकरच गावातील इतर रस्तेही मोकळे होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी नायब तहसीलदार वीर साहेब, अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निर्मल साहेब, सावळे मॅडम, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के पाटील, तलाठी कल्पना वानखेडे, कोतवाल किशोर जाधव, भाजपा नेते लक्ष्मण अंभोरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे पी.ए. गोपाल म्हस्के,सरपंच गजानन अंभोरे, सरपंच चेतन म्हस्के, डॉ. संदीप म्हस्के,पोलीस पाटील सुरेश पाटील, ग्रा. सदस्य भागवत म्हस्के तसेच असंख्य शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संतोष काकडे साहेब, नायब तहसिलदार हरी विर साहेब यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
