AI, ROBOTICS व IOT विषयावर सेमिनार संपन्न ….

IMG-20250921-WA0022

लोणार (यासीन शेख)रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कै. कु. दुर्गा क बनमेरू विज्ञान महाविद्यालय,लोणार कै. कमलाबाई बनमेरू महिला महाविद्यालय,लोणार व पी एच एन. टेक्नॉलॉजी,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय सेमिनार महाविद्यालयात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून टेक्नॉलॉजी पुणे चे ट्रेनर श्रीकांत दायमा उपस्थित होते. सर्वप्रथम या एकदिवसीय सेमिनार बाबत प्रा. डॉ. सौरभ गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकातून AI , ROBOTICS व IOT बाबत PHN, TECHNOLOGY , PUNE कंपनी करत असलेलं कार्य याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यानंतर प्रमुख मार्गदर्शक श्रीकांत दायमा यांनी पी एच एन कंपनी तयार करत असलेले आय , IOT आधारित रोबोट व त्याची निर्मिती प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली यामध्ये त्यांनी विविध रोबोट व त्यांची कार्यप्रणाली याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. अध्यक्ष समारोपातून प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी विद्यार्थ्यांना AI, IOT ROBOTICS हे आजच्या काळातील महत्त्वाचे घटक आहेत यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या रोजगाराच्या संधी शोधाव्या असे सांगत यासाठी महाविद्यालय सर्व प्रयत्न करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः जागरूक राहून महाविद्यालयाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या विविध उच्चतंत्र ज्ञानाचा फायदा करून घ्यावा असे सांगितले. यानंतर काही विद्यार्थ्यांनी सेमिनार बाबत स्वतःचे सकारात्मक मत या ठिकाणी मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेमिनार चे समन्वयक प्रा. शारीक शेख यांनी केले.हा सेमिनार यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. सूर्यकांत बोरूळ,प्रा.डॉ. कमलाकर वावळ, प्रा. शिवशंकर मोरे,प्रा.डॉ.महेंद्र भिसे , प्रा. मंगेश ठोंबळ,प्रा. डॉ. मिलिंद गायकवाड,प्रा राजू असोले,प्रा. प्रतीक सानप,प्रा. आशिष बिबेकर,प्रा. डॉ. वर्षा मिश्रा,प्रा. मगर, प्रा. आकाश काळे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या सेमिनार यशस्वी करण्यासाठी अमृत सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषाताई गोले व सचिव डॉ. संतोष बनमेरू यांचे मार्गदर्शन लाभले होते. या सेमिनारचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ.सूर्यकांत बोरुळ यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!