अंत्रीखेडेकर येथील विजय खरात कामचुकार महसूल अधिकारी यांची बदली करण्यासाठी अंत्री खेडेकर आसोला बु येथील शेतकऱ्यांनी दिले निवेदन…..
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द मंडळातील असोला बुद्रुक आणि अंत्री खेडेकर येथील शेतकरी महसूल अधिकारी विजय खरात यांच्यापासून त्रस्त आहेत त्यांना भेटण्यासाठी अंत्री खेडेकर आसोला येथील शेतकऱ्यांचा दिवस दिवस वाट पहावी लागते तरीपण महसुलाधिकारी हे मुख्यालय अंत्रीखेडेकर येत नाही चिखली येथुन कारभार पाहतात त्यांच्याकडे महसूल विषयाचे काम दिले तर ते सुद्धा दोन दोन तीन तीन महिने होत नाही अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे वारसाच्या फेर दिली आहे त्याचे सुद्धा काम झाले नाही काही शेतकरी त्यांच्याकडे महसूल विषयी काम घेऊन गेले असता शेतकऱ्यांना ते उडवा उडवीचे उत्तरे देतात अंत्री खेडेकर येथील अनेक वारसाची नोंद करण्यासाठी मागील तीन महिन्यापासून त्रस्त आहे अजून पर्यंत त्यांची वारसाची नोंद झाली नाही असे अनेक शेतकरी आहेत की ते त्यांच्या शेती विषयीचे कामापासून त्रस्त आहेत अंत्री खेडेकर येथील एका विधवा महिलेची फाईल महसुलाधिकारी विजय खरात यांच्याकडे दिली आहे परंतु त्याची सुद्धा त्यांनी वारस अजून पर्यंत लावलेले नाही सदर महसुलाधिकारी हे यांचे दलालामार्फत चे काम वेळेवर करतात अशी सुद्धा असोला बुद्रुक आणि अंत्री खेडेकर येथे चर्चा आहे आज चिखली तालुक्याचे महसूल विभागाचे तहसीलदार संतोष काकडे यांचा जिंवत सातबारा हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवगत केले आहे परंतु अंत्री खेडेकर असोला बुद्रुक येथील कामचुकार महसुल अधिकाऱ्यामुळे चिखली तालुक्याचे तहसीलदा यांचे नाव खराब करणयाचे काम महसुल अधिकारी विजय खरात करत आहे चिखली महसूल विभागाचे नाव चिखली तालुका म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गर्वाने घेतल्या जात आहे परंतु कामचुकार महसूल अधिकारी विजय खरात यांच्या प्रतापा मुळे महसूल विभागाला काळा डाग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आज शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले लागतात ते सुद्धा वेळेवर मिळत नाही तसेच काही लोकांना वैद्यकीय कामासाठी दाखले लागतात परंतु कामचूकर महसूल अधिकारी हे वेळेवर येत नाही अंत्रीखेडेकर व आसोला येथे लोक दिवस दिवस वाट पाहतात परंतु महसूल अधिकारी हे त्याना भेटत नाही आणि महसूल अधिकारी आपला दूरध्वनी सुद्धा बंद करून ठेवतात त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चिखली येथे रिकाम्याच फेऱ्या माराव लागत आहे त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा होत आहे याकडे माननीय तहसीलदार साहेब कोणत्या प्रकारे लक्ष देऊन कार्यवाही करतात याकडेच सध्या सर्व असोला बुद्रुक आणि अंत्री खेडेकर येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे जर माननीय तहसीलदार साहेब यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर अंत्री खेडेकर वाशी आणि असला बुद्रुक वाशी हे उपोषणाचा पवित्र कधीही घेऊ शकतात.
