सिंदखेड राजा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान उपविभागीय अधिकारी व तहसिलदार शेतकऱ्यांच्या बांधावर….
सिंदखेडराजा (अनिल दराडे )
सोनोशी, सोयंदेव, रूम्हणा आणि खैरखेड या नदीकाठच्या गावांचा संपर्क या मुसळधार पावसामुळे तुटलेला आहे. सतत प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.शेकडो एकर शेतीवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे संकट अधिकच वाढले आहे.

पिकांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांमध्ये हतबलतेचे वातावरण निर्माण झाले असुन सिंदखेडराजा राजांचे दबंग उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या सह महसूल विभागातील तलाठी व इतर कर्मचारी. यांचा ताफा शेतकरी यांच्या बांधावर धडकला व शेतकरी यांचे म्हणे समजुन घेऊन सविस्तर चर्चा केली शेतकरी राजा यांना योग्य ती मदत केली जाईल असे ठोस निर्णय उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी सांगितले
गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

बुलढाण्यात खाजगी दवाखान्या विरोधात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारचा बुलंद आवाज गरजला, त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार यांच्यावर झालेल्या भ्याडहल्याचा केला जाहीर निषेध….
