शेलू येथील रात्रीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करून त्वरीत नूकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांचे शासनाला साकडं

Screenshot_2025-09-22-20-21-23-67_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा( अनिल दराडे )सिंदखेड राजा तालुक्यातील शेलू येथे काल रात्री ढगफुटी झाली असून शेतकरी सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहेत. परतीच्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिकं उध्वस्त झाली आहेत, आर्थिक परिस्थिती ढासळली आहे, आणि जगण्याचा लढा अधिक तीव्र झाला आहे. शेलू येथील गंगाधर एखंडे यांच्या शेतातील कपाशी पूर्ण वाहून गेली व नाल्याना मोठं बोगदाड पडलं, अप्पासाहेब एखंडे यांच्या नेट मिरची पिकासाहीत संपूर्ण नुस्कान झाले, धोंडीराम एखंडे यांचा छोटा हत्ती वाहन पुरात वाहून गेला, राजेभाऊ रंधवे यांच्या कपाशीत पूर्ण झाले असून त्यांनी त्या पाण्यात सरकारला साकडं घातलं, रोहित एखंडे याच्या कपाशी पूर्ण पणे बुडासहित वाहून गेली, विष्णू एखंडे यांच्या शेतात तलावतील व नाल्यातील दगड वाहून आले कपाशीचे पूर्ण नुकसान झाले भोसा येथील बाळासाहेब शेळके यांच्या कपाशी मध्ये पूर्ण पाणी झाली आणि नदीच्या कडेला शेत भोगदा पडला यांच्या सह अनेक शेतकऱ्याचे पिकांचे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक मदत करून सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा
या संकटकाळात सरकारने तातडीने हस्तक्षेप करून “ओला दुष्काळ” जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ पंचनामे सुरू असल्याची माहिती देणे हे अपुरे आहे आणि याला तात्कालिक कारवाईची जोड दिली गेली पाहिजे
पंचनामे हे नाट्य नव्हे, उत्तरदायित्वाची प्रक्रिया असावी
जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न थांबवा दरवेळी संकटाच्या वेळी सामाजिक, जातीय किंवा इतर चर्चांनी जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न केला जातो. ही जुनी पद्धत आता चालणार नाही. शेतकरी, त्यांची पिढी आणि त्यांची पुढची पिढीही आता सजग आहे, जागरूक आहे आणि प्रश्न विचारायला शिकलेली आहे.
दुर्लक्ष केल्यास परिणाम भोगावे लागतील
जर सरकारकडून यावर गांभीर्याने पावले उचलली गेली नाहीत, तर शेतकऱ्यांमध्ये रोष वाढेल. ही नाराजी पुढे जाऊन तीव्र आंदोलनाचे रूप घेऊ शकते. शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणे कुणालाही परवडणारे ठरणार नाही.शेतकरी वाचला, तर देश वाचेल.
शेतकऱ्यांचे प्रश्न हे राजकीय नव्हे, तर मानवी अस्तित्वाचे प्रश्न आहेत.
सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी आणि तात्काळ उपाय करा अशी आस शेलू येथील सर्व शेतकऱ्यांना लागली आहे

You may have missed

error: Content is protected !!