मेरा बु जिल्हा परिषद सर्कल मधील जागृत देवस्थान तपोवन देवी रोहडा येथील रोडची दुरुस्ती. गजानन वायाळ यांच्या प्रयत्नाला यश ….
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे रोहडा येथील तपोवन देवी संस्थान संपूर्ण चिखली परिसरात नव्हे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तपोवन देवी संस्थान ही प्रसिद्ध आहे परंतु या ठिकाणी देळगाव राजा चिखली हवेवरून जाण्यासाठी जो रस्ता होता तो अत्यंत खराब म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे अवस्था रस्ताची झाली होती तपोवन देवी संस्थान येथे भक्तांना जाण्यासाठी कोणाताही रस्ता देऊळगाव राजा चिखली हवेवरून तपोवन देवी संस्थान पर्यंत जाण्यासाठी योग्य नव्हता चार चाकी गाडी खिळ खिळ होवून जायची आणि मानसिक त्रास सुद्धा होत होता ही बाब शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाअध्यक्ष गजानन वायाळ यांच्या लक्षात आली आणि आपल्या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तपोवन देवी संस्थान येथे भक्त मंडळी येतात आणि त्यांच्या जाण्या येण्यासाठी भक्तांना जो त्रास होतो हे पाहून गजानन वायाळ यांनी वारंवार शासकीय कार्यालय पत्रव्यवहार करून या रोडच्या दुरुस्तीची मागणी केली होती शासन तरीही ऐकायला तयार नव्हते त्यावेळेस गजानन वायाळ यांनी गांधीगिरीच्या मार्गाने 15 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाही मार्गाने उपोषणाचा शासनाला विसरा दिला आणि 15 ऑगस्ट 2025 रोजी रोहडा येथील ग्रामपंचायत भवना समोर उपोषणही सुरू झाले त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन लवकरात लवकर कामाला सुरुवात करू असे लेखी आश्वासन दिले होते रोहडा येथील ग्रामस्थांनी गजानन वायाळ यांनी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते आणि आता नवरात्र मध्ये नवरात्र च्या सुरुवातीलाच देळगाव राजा चिखली हावे पासून तपोवन देवी संस्थान पर्यंत सदर रोडची दुरुस्ती करण्यात आली आहे काम पूर्ण झाल्यानंतर शरद चंद्र पवार पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष गजानन वायाळ त्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली आणि रोहडा येथील ग्रामस्थ यांचा आनंद द्विगुणीत झाला तसेच आता संपूर्ण महाराष्ट्र मधून येणाऱ्या भक्तासाठी सुद्धा तपोवन देवी रस्ता हा सुखकारक झाला आहे या रोडवर यापूर्वी छोटे-मोठे भरपूर अपघात झाले होते ही बाब गजानन वायाळ आणि रोहडा येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सदर रोडचा रस्त्याचा पाठपुरावा केला आहे आणि त्याला यश सुद्धा आले आहे सदर रस्त्याची दुरुस्ती ही तपोवन देवी संस्थान येथील नवरात्र उत्सवाच्या आधीच दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे तपोवन देवी येथे येणाऱ्या भक्तांना जो त्रास होणार होता तो आता होणार नाही रोहडा येथील ग्रामस्थांनी गजानन वायाळ यानी रोडचे काम पूर्ण केल्यामुळे आभार सुद्धा मानले आहे
