सिंदखेडराजा उपविभागामध्ये महसूल लोकअदालतीचे आयोजन
सिंदखेडराजा( अनिल दराडे )
महाराष्ट्र शासन, महसूल विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधव आपल्या वेगवेगळ्या महसूली प्रकरणांसाठी अर्धन्यायिक स्वरूपाची प्रकरणे महसूल विभागाकडे सादर करतात. सदर प्रकरणांमध्ये जलद गतीने निपटारा होऊन त्यांना न्याय मिळावा हा महाराष्ट्र शासनाचा हेतू आहे. या अभियानाचा एक महत्वाचा उपक्रम म्हणून आज सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे मा. जिल्हाधिकारी बुलढाणा डॉक्टर किरण पाटील यांच्या मार्गदर्शना खाली लोकअदालतीचे आयोजन दि.23.09.2025 (मंगळवार) रोजी करण्यात आले होते. सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये महसूली, अर्धन्यायिक तसेच अपिल प्रकरणे जलद गतीने काढण्याच्या उद्देशान महसूली लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. आज झालेल्या लोकअदालतीमध्ये एकूण 22 महसूली प्रकरणे सुनावणीकरिता ठेवण्यात आली होती. त्यापैकी 4 प्रकरणे सांमज्यस्याने तर 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशी एकूण 8 प्रकरणे लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेली आहेत. वकीलसंघ,सिंदखेडराजा व देऊळगांव राजा यांचे महसूली लोकअदालतीकरिता सहकार्य मिळाले असे सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.
महसुली लोक आदालती मध्ये लवकरात लवकर प्रकरण निकाली काढून दोन्ही पक्षकारांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
(प्रा.संजय खडसे)
उपविभागीय अधिकारी
सिंदखेडराजा.
