मंठा रोडवरील तो खड्डा तात्काळ बुजवण्याची मागणी
लोणार (यासीन शेख)जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर हे नेहमी पर्यटकांसाठी आकर्षक पर्यटन स्थळ असून येथे दररोज हजारो पर्यटक येत असतात विशेषतः
नवरात्र उत्सवामध्ये माँ कमळजा मातेच्या दर्शनाला विदर्भ व मराठवाड्यातून भक्तांचा जनसागर उसळतो. सद्या सगळीकडे पावसाचे थैमान घातले आहे. तरी सुद्धा माँ कमळजा मातेच्या दर्शनाला मंठा रोड वर भक्तांची गर्दी होत आहे.
मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी हाच मार्ग आहे याच रोडने शेगाव पंढरपूर पालखी मार्ग गेला आहे.यामुळे वाहनाची नेहमी वर्दळ असते मंठा रोडवर लावण्यात आलेल्या लोणार सरोवर प्रवेशद्वारा जवळ खड्डा होऊन या ठिकाणी पाणी साचत आहे या ठिकाणी उतार असल्याने वाहने सुसाट वेगाने धावतात खड्डयात साचलेलं पाणी ये जा करणाऱ्यांच्या अंगावर उडत आहे तर काही वाहने खड्डा वाचवण्याचा प्रयत्नात विरुद्ध दिशेने वाहन टाकून आपली वाट काढत आहे त्यामुळे अपघात पण घडण्याची शक्यता आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ हा खड्डा बुजवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
