सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात, खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी व रोगराईमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…
सिंदखेडराजा (अनिल दराडे )
सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटातमोठया सापडले असून खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी व रोगराईमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून गेले आहे. यंदा सुमारे 64 हजार शेतकऱ्यांनी विविध पिकांचा पिकविमा भरलेला असून, शासनाने नुकसानीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा दिला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासन ठराव क्र. प्र.वि.यो.-2025/प्र.क्र. 66/21, दि. 25 जून 2025 नुसार नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, अतिवृष्टी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणे अपेक्षित आहे. मात्र सध्या तालुक्यातील शेतकरी अतिशय बिकट अवस्थेत असून उभ्या पिकांचे अक्षरशः नुकसान झाले आहे.
निवेदनावर रवि भाषाव, पटनेश्वर खरात, यासीन रोख, नितीन शबळे पाटील, भनीन शेवाळे, विकास ठाकरे, सुरेश राठोड, सागर जोगळे, आशीष पोधे, कचकनी भारसकर, गोपाल माने, राजु कोगने, मदन भाधान, शिवानंद मुंढे, विजय कुहीर, गजानन चव्हाण, भगवान वालने, अभय मोगल, रामकिसन नागरे, अशोक मोगल, गवामी ढाकने, पोलिपी व इतर शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.ही मागणी मा. तहसीलदार सिंदखेडराजा, जिल्हा कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याकडे करण्यात आली असून मा. आमदार मनोजभाऊ कायदे, खासदार प्रतापराव जाधव, पालकमंत्री मकरंद मामा पाटील व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना तातडीने सरसकट पिकविमा मिळालाच पाहिजे, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील या वेळी देण्यात आला.
