चिखली तालुक्यात वनप्राण्यांची धुमाकूळ शेतकरी संकटात,वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची टाळाटाळ
चिखली ( एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यात बहुतांश जमीन जंगलातला लागून आहे जंगलातून रोही डुक्कर काळ पाणी शेजारच्या शेतात उतरतात आणि काही तासातच उभे पीक स्पष्ट करतात यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होत आहे संबंधित विभागाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली होती चिखली तालुक्यातील भरोसा रामनगर, देऊळगाव घुबे,अंत्री खेडेकर, मलगी, अंचरवाडी , शेळगाव अटोळ,ईसरुळ, मंगरुळ,मिसाळ वाडी, पिंपळवाडी,असोला,या गाव जंगलाला लागूनच आहे येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सुद्धा जंगलात आहेत जंगलातील वन्यप्राणी कल्पने शेतात उठतात उतरतात व शेतातील सोयाबीन भुईमूग दूर इतर पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट करतात उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे शेतकरी काहीही करू शकत नाही यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी वन विभाग व संबंधित विभागात तक्रार केली असता एक ते सव्वा महिना झाला असताना वन विभागाने सुद्धा नुकसान भरपाई देत नाहीत यामुळे शेतकरी शेती कशी करायची असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे या सोबतच याविषयी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या शेतातील स्वायबीन भुईमंग व तूर इतर पिकाची जंगली प्राणी नासाडी करतात शेकडो एकरातील लाखो रुपयांच्या पिकाची नासाडी सुरूच आहेत आधीच अतिवृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकरी वर्ग या जंगली प्राण्यांमुळे उध्वस्त होत आहे वन विभाग व तहसील कार्यालयाने तात्काळ पाहणी करून आर्थिक मदत करावी अशी मागणी चिखली तालुक्यातील भरोसा येथील विष्णू श्रीराम थुटटे, भानुदास श्रीराम थुटटे, स्वाती विष्णू थुटटे, अंकुश भानुदास थुटटे, रामदास साळूबा थुटटे, अशोक संतोषराव गवते, सचिन परमेश्वर गवते यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली
मागच्या लोकांचे फायलीचे काम सुरू आहे तरीसुद्धा तुमची फाईल समोर आले की फाईल चेक करून त्याचे पेमेंट टाकण्यात येईल माझ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे काम आहे माझ्याकडून जेवढं झालं तेवढं काम करेल
सुनिल वाकोडे
वनपरिक्षेत्र बुलढाणा
