फायदा मराठवाड्याचा नुकसान विदर्भाचे डोलखेड येथील धरणाचा प्रताप वारंवार तक्रारी करूनही गेंड्याचे कातडे असलेल्या पाटबंधारे विभाग झोपेतच धरण उठले अमोना येथील शेतकऱ्यांच्या जीवावर.
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे अमोना येथील शेतकरी वारंवार पाटबंधारे विभाग यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा पाटबंधारे विभागाने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही अमोन येथील लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या मराठवाड्यातील डोलखेड येथील धरणाच्या नदीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची काळजी आज लोक सुद्धा घेतली नाही आजही लोक आपला जीव मोठीत धरून येणे जाणे करत आहे सदर धरण हे मराठवाड्यातील असून त्याचा फायदाही मराठवाड्यातील जनतेलाच होत आहे परंतु या धरणाचे तोटा धरणाच्या साठ्यावर होतो साठ्यामुळे आम्हाला गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास होत आहे आज शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाशी लढत असताना शासनाच्या निर्ज्य कारभारामुळे सुद्धा त्रस्त आहे हे जर असे चालू राहिले तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही या गावातील ज्या थर्माकोलच्या थर्माकोल वरून रहिवासी प्रवास करतात त्यामध्ये काही महिला थर्माकोल वरून पडून त्यांचा जीव मरता मरता वाचला आहे याची कोणतीही सोयरसुतुक पाटबंधारे विभागाला नाही यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा पाटबंधारे विभाग यांनी या गावाच्या समस्येकडे साधे डूंकूनही पाहले नाही अशा निर्लज्ज पाटबंधारे विभागाच्या कर्मचारी यांचा अमोन गावानी अनेक वेळा निषेध सुद्धा केला आहे परंतु गेंड्याची कातडी असलेल्या पाटबंधारे विभागाला याचे कोणतेही स्वरूप नाही शेतीमध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवासकरावा लागत आहे शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा संपायचे नाव घेत नाहीत. बुलडाणा जिल्ह्यातील अमोन गावातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी नाकीनऊ येत आहे. १९९२-९३ मध्ये पाटबंधारे विभागाच्या कामामुळे झालेल्या बदल्यात गावातील मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. त्यामुळे आजतागायत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दरवर्षी पाण्यातूनच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.गेल्या २५ वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी पाण्याच्या प्रवाहातून तात्पुरत्या तराफ्याचा आधार घेत आहेत. गावातील शेतकरी, महिला, लहान मुले रोज पाण्यातूनच शाळा, दवाखाना किंवा शेतीकामांसाठी जाताना दिसतात. यातून अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असून, लोकांच्या जिवीताचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गावात जाण्यासाठी असलेला मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.शेतात जाण्यासाठी तात्पुरते लाकडाचे व थर्माकोलचे तराफे तयार करून लोक प्रवास करतात.आजारी व्यक्तींना, गर्भवती महिलांना दवाखान्यात घेऊन जाणे कठीण होत आहे.पावसाळ्यात २०० ते ५०० घरांना याचा फटका बसतो आहे.यामुळे शेती व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
चौकट..
ग्रामस्थांनी वारंवार शासन, पाटबंधारे विभाग व प्रशासनाकडे मागणी करूनही आजतागायत कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. याबाबत गावकऱ्यांनी पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने पर्यायी रस्ता व सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
तातडीची मागणी :
गावाला शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी पर्यायी रस्ता द्यावा.पावसाळ्याच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
अपघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांना संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने करावी.
