मेहकर (बुलढाणा माझा न्युज) मेहकर शहराला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे मेहकरचे जगभर नाव शारंगधर बालाजीच्या मूर्तीने आहे त्यामुळे मेहकरची ओळख शारंगधर नगरी झालेले आहे . पैनगंगेच्या तीरावर वसलेले शारंगधर मंदिरालगत पेनंगेच्या तीरावर गायत्री माता मंदिर आहे असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे . मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतुन झालेले असून स्व .भास्करराव मिनासे यांनी मंदिराला जागा दान दिली लोकवर्गणीतून भव्य मंदिर उभारले गेले .प .पू . आचार्य श्रीरामजी शर्मा संस्थापक असलेले गायत्री परिवार च्या मेहकर शाखेच्या वतीने गायत्री माता मंदिरामध्ये विविध धार्मिक उपक्रम पार पडतात .गायत्री मातेच्या मूर्तीची स्थापना 2001 झाली असून नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिरामध्ये करण्यात येते . नवरात्र उत्सवात अखंड यज्ञकुंड चालतो तसेच कन्या पूजन करतात . दैनंदिन अखंडित यज्ञ रोज सकाळी सात ते आठ वाजता संपन्न होतो गायत्री परिवाराच्या माध्यमातुन नदी स्वच्छता अभियान ,व्यसनमुक्ती अभियान , वृक्षारोपण, भारतीय संस्कृती प्रमाणे वाढदिवस व लग्न वाढदिवस दिवे लावून साजरे करण्यात येतात तसेच गोरक्षणालय येथे गायत्री परिवाराचे सदस्य सेवा देतात . दर पौर्णिमेला पाचशे लोकांना महाप्रसादाचे (भोजन)आयोजन केले जाते .पूरग्रस्तांसाठी मदत भारतीय संस्कृती जतन आणि संवर्धन व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात
अखंडित यज्ञ व कन्यापुजन
गायत्री मंदिरामध्ये रोज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत यज्ञ करण्यात येतो . या मध्ये भाविकांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसुन पुजेसाठी लागणारे सर्व साहित्य मंदिरांच्या वतीने उपलब्ध करून दिले . तसेच यज्ञ करत असतांना विविध विधीचे वैज्ञानिक महत्व सांगितले . नवरात्र उत्सवामध्ये पंचकुंडी यज्ञाचे आयोजन केले जाते . तसेच नवरात्र उत्सवामध्ये कन्या पुजन करण्यात येते या मध्ये भाविक कन्या ना विविध वस्तु भेट स्वरूपात देतात . नवरात्र उत्सवामध्ये गायत्री मंदिर येथे सुरू असलेल्या यज्ञामध्ये सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आव्हान गायत्री परिवार च्या वतीने करण्यात आले आहे .