राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन प्रा. दिलीप नाईकवाड

IMG-20250925-WA0015

सिंदखेडराजा (अनिल दराडे) राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीयी एकात्मतेचे सशक्त साधन आहे.असे विचार दैनिक सांजशक्तीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा.दिलीप नाईकवाड यांनी काढले. नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या २४ सप्टेंबर या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.विजय नागरे होते. सुरुवातीला राष्ट्रसंत भगवान बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रा. नाईकवाड म्हणाले कालच महाविद्यालयाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी केली.त्यांचे जीवनाचे सूत्र एकात्मदर्शन
आहे.आज राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस साजरा होत आहे हा दिवस म्हणजे आज पासून पंधरा दिवस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय नागरे यांनी घोषित केल्याप्रमाणे अनेक उपक्रमांनी साजरा होणार आहे त्यापैकी स्वच्छता अभियान महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करून कृतीने सुरू करण्यात आलेले आहे.
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विविध सामाजिक गटांना एका राष्ट्रीय घटकात आणि प्रवाहात सामील करून घेण्याची प्रक्रिया राष्ट्रभक्त नागरिक घडवण्याची प्रक्रिया माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी हे रासोयो चे ब्रीद वाक्य आहे. रासोयोतुन राष्ट्रभक्ती, सेवाभावी वृत्ती, विज्ञाननिष्ठा, प्रामाणिकपणा, उदारता, विश्वास पात्रता,आशावाद, खेळाडू वृत्ती, इत्यादी गुणाचं संपादन केल्या जातं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नागरे यांनी २०११ पासून महाविद्यालयाची सूत्र हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून आणि वृक्ष संवर्धन करून परिसर “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” करून टाकलेला आहे. महाविद्यालय आणि महाविद्यालयाची दत्तक ग्राम या ठिकाणी शिबिर घेऊन अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी प्रयोग-शीलतेने कृती करून राबविलेले आहे.पाणी आडवा पाणी जिरवा प्रत्येक गावातील बंधारे याची साक्ष देत आहेत.महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थीनां आकार येण्याचं काम करत आहे त्याचं कौतुक
आहे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विजय नागरे यांनी येणाऱ्या पंधरा दिवसात महाविद्यालय व परिसर स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, जलसंवर्धन, प्लास्टिक निर्मूलन उपक्रम येत्या पंधरा दिवस दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पर्यंत राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची माहिती प्राचार्य नागरिक सर यांनी देत पोस्टर, निबंध, लेखन, स्पर्धा, चर्चा, भाषेनं,हे उपक्रम महाविद्यालयात राबवल्या गेले ते त्यांनी सांगितले. समाजातील सर्वात गरीब दुर्बल आणि मागासलेल्या लोकांची उन्नती व कल्याण करणे या संदर्भात पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी केलेले कार्य आणि राष्ट्रीय सेवा योजनेची कार्य या दोन्हीमध्ये समानता हा धागा आहे अंतोदय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे हे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल ‌रासेयो माध्यमातून आपण समाज उपयोगी उपक्रम राबवून शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याचं काम करणार आहोत असे याप्रसंगी प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी सांगितले महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाचा कामाचा आढावा त्यांनी घेतला घेत
याप्रसंगी महाविद्यालयाचे रायसो सहकार्यक्रम अधिकारी प्रा.श्रीमती नयना मॅडम, प्रा.भगवान शिंदे,प्रा मिलिंद गवई, प्रा.मेहरसर, ग्रंथपाल सुधाकर तारे,प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर गजानन मुंढे, अनिल रणमळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!