अज्ञात वाहनाने नीलगाय उडवली गाई बरोबर पोटातील वासराचा ही मृत्यू.
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली ते मेहकर हवेवर दिनांक 25 सप्टेंबर2025रोजी रात्रीला अज्ञात वाहनाने राजवाडा हॉटेल समोर अज्ञात वाहनाने निलगायला जबरदस्त धडक दिल्यामुळे नील गाईचा जागीच मृत्यू झाला आहे धडक इथली जबरदस्त होती की नील गाईच्या पोटातील आतडे व पोटातील लहान पिल्लू हे सुद्धा धडकेमध्ये बाहेर आले होते याची माहिती वनविभागाचे वनपाल विलास मेरत यांना कळताच त्यांनी आपले वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक चोले यांना घेवून कर्मचाऱ्यासह राजवाडा हॉटेल येथे येऊन निल गायची विल्हेवाट लावली आहे सदर अपघात हा 25 सप्टेंबर च्या रात्रीला तीन ते चार वाजेच्या दरम्यान झाल्या असल्याचे माहिती समोर येत आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने खड्ड करून निलगायचा दफनविधी केला आहे
