प्रियंका देशमुखची राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरासाठी निवड….
सिदखेडराजा (अनिल दराडे) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे मलकापूर-पांग्रा येथील कु.प्रियंका देशमुख हिची राज्यस्तरीय प्रेरणा शिबीरासाठी निवड झाली आहे.मलकापूर-पांग्रा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद देशमुख यांची ती सुकन्या आहे.
विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय प्रेरणा व आव्हान शिबिरासाठी निवड संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ता .१६ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय,बुलढाणा येथे पार पडली. यामध्ये विज्ञान महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्यानी सांस्कृतिक गट व शारीरिक तंदुरुस्त गट ह्यात सहभाग घेतला. ह्यामध्ये शारीरिक तंदुरुस्त गटातून श्याम गिऱ्हे व नेहा घनवट तर सांस्कृतीक गटातून संदेश जाधव, गायत्री गायकी व प्रियंका देशमुख यांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये महाविद्यालयाच्या सर्व ५ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड होऊन ते विद्यापीठस्तरीय निवड चाचणी साठी पात्र ठरले.ता.१९ सप्टेंबर ला विद्यापीठस्तरीय निवड चाचणी ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ.जिचकार सांस्कृतिक सभागृह व परिसरातील मैदानात पार पडली. यामध्ये विद्यापीठातील सर्व जिल्हास्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि आपले सादरीकरण केले.यामध्ये अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली.त्यात सांस्कृतिक गटातून विज्ञान महाविद्यालयातील कु.प्रियंका प्रल्हाद देशमुख हिची राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरासाठी तर शारीरिक तंदुरुस्त गटातून शाम गिऱ्हे व कु.नेहा घनवट यांची निवड राज्यस्तरीय आव्हान शिबिरासाठी निवड झाली आहे.प्रेरणा शिबिराच्या प्रतीक्षा यादीत कु.गायत्री गायकी यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्राध्यापक, विद्यार्थी तथा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
