मेरा बु श्री.शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचा प्राचार्य यांचा प्रताप .
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु येथील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये मुलाचा नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी चार महिने होऊन सुद्धा नावामध्ये दुरुस्ती न झाल्याने मुलगा एनडीएच्या परीक्षेला मुकल्याने हातबल झालेल्या पालक सय्यद मुस्ताक सय्यद इसा या पालकाने चक्क दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेच्या आवारातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला,

बाजूलाच उभे असलेले रामदास पडघान यांनी वेळीच विष प्राशन असलेली बाटली हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेने शाळा परिसरात एकच खळबळ उडाली. सविस्तर असे की गावातीलच सय्यद मुस्ताक यांचा मुलगा श्री शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेऊन पुणे येथे शिक्षण घेत असून काही दिवसा अगोदर NDA चे परीक्षा नावात दुरुस्ती न झाल्यामुळे देऊ शकला नसल्याने मुलगा हताश झाल्याने,हतबल झालेल्या सैय्यद मुस्ताकने शाळेच्या आवारातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली होती. पालक यांना वीस प्राशन करण्याचा प्रयत्न का करत आहात विचारले असता मी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मेरा बुद्रुक येथील प्राचार्याकडे चार महिन्यापासून चक्र मारत आहे त्यांनी मला आज लोक उडवा उडवीचे उत्तरे दिले आहे आणि अमरावती जाण्यासाठी पैशाची मागणी सुद्धा केली आहे मी एक सर्वसाधारण पालक असल्यामुळे मी यांना आज लोक पैसे देऊ शकलो नाही त्यामुळे त्यांनी माझे काम अडवून ठेवले आहे माझ्या मुलाची शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे माझे मनस्थिती बिघडली आहे.चार महिन्यापासून शाळेमध्ये मुलाचा शाळा सोडण्याचा दाखला व बोर्ड सर्टिफिकेट मध्ये नाव दुरुस्ती करण्यासाठी दिले होते चार महिने उलटूनही नाव दुरुस्त शाळेने न केल्याने मुलगा एनडीएच्या परीक्षेला मुकला शाळेने अगोदरच मुलाच्या नावामध्ये दुरुस्ती केली असती तर मुलगा परीक्षेला मुकला नसता त्यामुळे हतबल झाल्याने मी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला.शाळा प्रशासनाने नाव दुरुस्तीसाठी पैशाची सुद्धा मागणी केली होती. आशी माहिती सुद्धा पलाक यांनी कॅमेरासमोर दिली आहे.
