सेवा निवृत्तांचा तौफीक कुरेशी यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा …

IMG-20250926-WA0012

लोणार (यासीन शेख)दिनांक 25/9/2025 रोजी इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज लोणार मधील निवृत्त होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा नगरपरिषद लोणारचे माजी नगरसेवक व बांधकाम सभापती मो.तौफीक हाजी अब्दुल लतीफ कुरेशी यांच्या निवासस्थानी पार पडला.
या कार्यक्रमात प्रा. इलाहीबक्श शेख मदार,प्रा.अब्दुल ताहेर अब्दुल सत्तार, प्रयोगशाळा सहाय्यक सगीर अहमद शेख अहमद, शिपाई असलम खान युसुफ खान व नगर परिषद लोणारचे लिपिक शेख ताहेर शेख गनी कुरेशी या मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तौफीक कुरेशी यांनी आपल्या भाषणात निवृत्त होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कार्य गौरविले आणि समाज कारणा बरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील योगदाना मुळेच समाजाला दिशा मिळते, असे नमूद केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते जावेद कुरेशी,शेख मोईन कुरेशी, (शिवना) शेख अफसर कुरेशी, रिसोड येथील सादिक खान असलम खान, युवा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मो. तौसीफ कुरेशी, तसेच NSUI विद्यार्थी काँग्रेस बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष मो. आकिब कुरेशी यांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मो. आकिब कुरेशी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शेख जावेद कुरेशी उर्फ जेडी यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!