चिखली तालुक्यात मेरा बु ग्रामपंचायत भवन परिसर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन,शेतकरी व नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. तहसीलदार संतोष काकडे

Screenshot_2025-09-18-20-27-51-57_680d03679600f7af0b4c700c6b270fe7

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द मंडळातील मेरा बु येथे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यभर “सेवा पंधरवडा” राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत चिखली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन 27सप्टेंबर रोजी मेरा बु येथे करण्यात आले आहे.
सदर शिबिरे तहसील कार्यालय चिखली तालुक्यातील मेरा खुर्द मंडळातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा . अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार श्री. संतोष काकडे यांनी केले आहे.
या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजना व सेवा नागरिकांना एका ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये प्रमुखतः
प्रलंबित फेरफार प्रकरणांची मंजुरी व डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वाटप
पंतप्रधान आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल लाभधारकांना मोफत वाळू वाटपासाठी अर्ज मंजुरी
PM किसान योजनेसाठी land seeding व पात्र शेतकऱ्यांचे eKYC
शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करणे
आधार नोंदणी व अद्यावत सेवा
उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेर, राष्ट्रीयत्व, अधिवास, वय दाखला आदी प्रमाणपत्रांचे वितरण
रेशन कार्ड नोंदणी, दुरुस्ती व eKYC
गावातील अकुशल व्यक्तींना जॉबकार्ड वाटप
आयुष्यमान भारत कार्ड व महात्मा फुले जनआरोग्य योजना लाभ नोंदणी
आरोग्य तपासणी व लसीकरण सेवा
महा DBT पोर्टलवरील कृषी व वैयक्तिक लाभाच्या योजना (फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, पॉलीहाऊस, शेततळे इ.)

जन्म/मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदी सेवा

शेतकरी, महिला, विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या व तक्रारी सोडविण्यासाठी आणि विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हे शिबिरे उपयुक्त ठरणार आहे तरी मेरा खुर्द मंडळातील सर्वच गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान चिखली तहसीलदार संतोष काकडे यांनी केले आहे

You may have missed

error: Content is protected !!