बोरगाव वसू येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतीशाळा संपन्न…….

IMG-20250927-WA0012

चिखली (निलेश कोल्हे)चिखली तालुक्यातील बोरगाव वसू येथे दिनांक 26सप्टेंबर ला कृषी विभागाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सोयाबीन पिकाची शेतीशाळा घेण्यात आली
सदर शाळेमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी श्री भरत शेळके यांनी सोयाबीन पिकाचे कीड व्यवस्थापन व कापणी पश्चात साठणूक या विषयावर मार्गदर्शन केले

तूर पिकातील कीड रोग या विषयावर बोलताना सहायक कृषी अधिकारी योगेश सरोदे यांनी तूर पिकातील मर रोग, वांझ रोग पाने गुंडाळणारी अळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.
सहायक कृषी अधिकारी श्री पवार साहेब यांनी महाडिबीटी, PMFME, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान, महाविस्तार ए आय ऍप तसेच कृषी विभागामार्फत राबावण्यात येणाऱ्या विविध योजना इत्यादी बाबत माहिती दिली
सदर कार्यक्रमास कृषी विभागाचे श्री विजय ठाकूर, विशाल गायकवाड गावचे सरपंच….., प्रगतशील शेतकरी पत्रकार तसेच महिला शेतकऱ्यांची लक्षनीय उप स्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदशन श्री पवार साहेब यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!