नागरिकांनी कामा शिवाय घराबाहेर पडू नये.. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे.
सिंदखेडराजा (अनिल दराडे )दोन दिवस हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा.नदी नाल्याला पूर असताना त्यामधून रस्ता ओलांडून जाऊ नका.हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस बुलढाणा जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तेव्हा नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे. मागील काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळदार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे हे ओसंडून भरून वाहत आहे त्या मुळे गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे.
अजूनही पावसाची संततधार चालू असल्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी पावसाचा अंदाज घ्यावा, विनाकारण घराबाहेर पडू नका, अगदी गरज असेल तरच, पूरस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षिततेला प्राधान्य द्या,ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असेल त्या ठिकाणी वरून जाण्याचा प्रयत्न करू नका, नदी नाल्याला पूर असताना रस्ता ओलांडू नये, असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व तहसिलदार यांनी सांगितले आहे
