लोणार परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; हजारो हेक्टर शेतीक्षेत्र पाण्याखाली

Oplus_16777216

Oplus_16777216

लोणार( यासीन शेख ) : जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची चिंतेत वाढ झाली होती. मात्र महिना अखेरीस राज्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.लोणार परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार पहावयास मिळत असून काल दि. २५ जूनच्यारात्रभर जोरदार पाऊस झाल्याने हजारो हेक्टर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले आहे. अंजनीखुर्द,हिरडव, सुलतानपूर परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाचे वातावरण असून आणखी तीन ते चार दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवार दि. २५ जूनच्या रात्री जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटींग केली. लोणार तालुक्यातील सुलतानपूर, हिरडव,अंजनी सर्कल मध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नद्या-नाले एक झाले असून शेतामध्ये तलावा प्रमाणे पाणी साचले आहे. पाण्याखाली असलेल्या कोवळ्या पिकाचे काय होईल याची चिंता शेतकरी करीत आहेत. अजूनही पाऊस सुरु असून पुढील तीन ते चार दिवस पावसाचे असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

You may have missed

error: Content is protected !!