राहेरी बु परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…..

IMG-20250928-WA0018

सिंदखेडराजा( अनिल दराडे )
आज सकाळी रात्री 2 वाजल्यापासून राहेरी बु, दुसरबीड, किंनगाव राजा, मलकापूर पांगरा तढेगाव हिवरखेड पुर्णा या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची तीव्रता अनुभवायला मिळाली. या मुसळधार पावसामुळे शिवारातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत.

राहेरी बु शिवारातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीला 2 वाजता मुसळधार पावसामुळे राहेरी बु, येथील गट नं 302 नंबर मधील शेतकरी समाधान गवई सह आनेक शेतकरी यांच्या सोयाबीन च्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप दिसून येत आहे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या शेतामध्ये पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेलेली आहे अचानक झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

या परिस्थितीत सरकारने तात्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा हक्काची रक्कम आणि नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे.
स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान नोंदवावे आणि मदतकार्य सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या:

  • सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा
  • शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी
  • पीकविमा रक्कम तत्काळ वितरित करावी
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे
  • या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदतकार्य सुरू करणे ही काळाची गरज

You may have missed

error: Content is protected !!