मेहकर -सिंदखेड राजा महामार्गावरून खडकपूर्णा नदीच्या पाणी पातळी वाढल्याने पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे कुणीही प्रवास करू नये………. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे
सिंदखेडराजा (अनिल दराडे) खडकपूर्णा धरणाची पाणी पातळी वाढल्याने खडकपूर्णा प्रकल्पामधून एकूण १९ वक्रद्वारा पैकी १२ वक्रद्वारे १ m ने व ७ वक्रद्वारा१.५ m ने सुरु करण्यात आले आहे त्यामुळे सिनखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सिंदखेड राजा -मेहकर ७५३ सी महामार्ग वरील वळण मार्गावरील राहेरी या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत असल्यामुळे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे या फुलावरून कुणीही वाहतूक करू नये असे आवाहन
सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे. काल रात्री पडलेल्या पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्प हा १०० % भरलेला असून प्रकल्पास असलेल्या १९ वक्राद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेजारील गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
प्रशासनातील अधिकारी हे सतत परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे असे मत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.
