बिबी येथील महावितरणचे कर्मचारी रात्री सुद्धा करतात दुरुस्तीची कामे

Screenshot_2025-09-28-20-03-13-06_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बिबी( ब्रम्हानंद वाकोडे )रात्रीच्या सुमारास दुसरबीड कडून बीबी कडे येणारी महावितरणची 33 केव्ही विद्युत वाहिनीवर दुसरबीड , शिवारातील साबळे पेट्रोलियम जवळ विद्युत पोलवर मोठी बिघाड होऊन बीबी परिसरातील सर्व विभागात जाणारी लाईन बंद पडली होती यावेळी सर्वत्र धो-धो पाऊस कोसळत असतानाच रात्रीचा अंधार सुद्धा खूप होता तरीही बीबी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ किरण थोरवे, विनायक कराड, रामेश्वर मुंढे, रवी अवघडे हेबिघाड झालेल्या ठिकाणी पोचून पाऊस, अंधार ,चिखल ,जंगल ,यांची तमा न बाळगता रात्री उशिरापर्यंत भर पावसात विद्युत वाहिनीच्या पोलवर चढून परिसरातील लाईट सुरू केली दुसर बीड करून बीबी कडे जाणारी 33 केव्ही ही विद्युत वाहिनी बऱ्याच ठिकाणी जीर्ण झालेल्या स्थितीमध्ये असल्यामुळे बऱ्याच ठिकाणावर सतत बिघाड होत असते तरीही महावितरणचे हे कर्मचारी आपली तत्परता दाखवत रात्री बे रात्री पाणी पाऊस ऊन वारा अंधार जंगल चिखल कुठलीही भीती न बाळगता तत्परतेने विद्युत सुरळीत करण्यासाठी धडपडत असतात परिसरातील सर्व विभागात जाणारी लाईनवर बारकाईने लक्ष ठेवून आप आपल्या विभागात लाईन सरळीत ठेवण्यासाठी नेहमीच दक्ष असतात

You may have missed

error: Content is protected !!