काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा राशनचा तांदुळ ट्रकसह पकडला. 42,92,200/-रु.चा मुद्देमाल हस्तगत. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालि अंतर्गत सामान्य, गरजु, गरीब नागरीकांना वितरीत होणारा तांदुळ तसंच इंतर धान्याची काळ्या बाजारात होत असलेली चोरटी वाहतूक आणि विक्री थांबवून, अशा घटनांना प्रतिबंध करुन, यामध्ये सहभागी इसमांचा शोध घेवुन, त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली होती. सदर आदेशानुसार पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक करुन, त्यांना वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सुचना केल्या. सदर अनुषंगाने पो.स्टे. जळगांव जामोद हद्दीत स्थागुशाचे पथकाने दि.28/09/2025 रोजी अत्यावश्यक वस्तु अधिनियम अंतर्गत कारवाई करून मुद्देमालाही जमा केला.
सविस्तर वृत्त असे की दि.28/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, ट्रकमध्ये शासनाचे सार्वजनिक वितरण प्रणालि अंतर्गत गरजु, गरीब व सामान्य नागरीकांना वितरीत होणारा तांदुळ काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी ट्रकमध्ये तांदुळ जात आहे. अशी माहिती मिळाली स्था.गु.शा.च्या पथकाने जळगांव जामोद ते नांदुरा रोड वरील घोडेगांव फाट्यावर सापळा रचून, ट्रकला चालकासह पकडून कारवाई केली. सदर कारवाईमध्ये वाहन चालक याचे ताव्यातून ट्रक क्रं. GJ 03 CU 2282 मध्ये 240 क्विटल कि.6.79,800/- रु.चा सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदुळ हस्तगत करण्यात आला, ट्रक चालक याने तांदुळ कोटुन आणला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सदरचा तांदुळ हा कुरणगाड बु. येथील विष्णु वावाराव आटोळे यांचे गोडावुन मधुन भरुन आणलेला आहे वरुन सदर गोडावुनचे ठिकाणी जावून पाहिले असता, गोडावून मध्ये 344 क्विटल तांदुळ कि. 10.32.000/- रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला तसेच तांदुळ मोजण्याकरीता वापरण्यात येणारे वजन काटे, पोते शिलाई मशीन व इतर साहित्य कि.40.200/- रु असा एकुण 10.72.200/- रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. ट्रक मधील व गोडावून मधील असा एकुण 584 क्विटल तांदुळ कि. 17.52.000/- रु चा हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास कारवाई पो.स्टे. जळगांव जामोद करीत आहेत. ही कारवाई ट्रक चालक भटटी कादर कासम, वय 55 वर्षे रा. अरब शेरी मालीया जि. राजकोट, गुजरात राज्य,
- वैभव सुनिल आटोळे, वय 25 वर्ष, रा. कुरणगाड ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा
- अंकुश केशन आटोळे, वय 22 वर्ष रा. कुरणगाड ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा यांच्याकडून मुद्देमाल
1) तांदुळ 584 क्विटल किं. 17,52,000/-रु. 2) ट्रक क्रं. GJ 03-CU2282 किं. 25,00,000/-रु..
एकूण- 42,92,200/-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई मा. श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्री. अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा, श्री. श्रेणीक लोढा, अपर पोलीस अधीक्षक, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळे. पोहेकॉ. जगदेव टेकाळे, पोकॉ. अमोल शेजोळ. मंगेश सनगाळे, निलेश राजपुत, चापोहेकॉ. विकास देशमुख नेमणूक-स्था.गु.शा. बुलढाणा यांचे पथकाने केली.
