खळबळजनक..! शेतीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांचा खून! आरोपी अमडापुर पोलिसांच्या ताब्यात…….

Screenshot_2025-09-29-09-37-02-45_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली( निलेश कोल्हे )
चिखली तालुक्यातील किन्ही सवडत येथे शेतीच्या हिस्से वाटपाच्या वादातून पोटच्या मुलानेच आई-वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील किन्ही सवडत येथे २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.चिखली तालुक्यातील किन्ही सवडत येथील पोलीस पाटील, श्रीकृष्ण धंदरे, यांनी पोलीस स्टेशन, अमडापुर येथे माहीती दिली की, श्री. महादेव त्र्यंबक चोपडे, व सौ. कलावती महादेव चोपडे, हे दोघे त्याचे घरात रक्तबंबाळ अवस्थेमध्ये बाजीवर पडलेले आहे. व दोघे ही काही हालचाल करीत नाही. अशी माहीती मिळताच ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक, निखिल ब. निर्मळ, पो.स्टे. अमडापुर यांनी, बिट अंमलदार मपोहेकॉ वंदना बोर्डे, पोकों प्रदीप चोपडे, पोकॉ सुनील भवटे, पोकॉ चंद्रशेखर मुरडकर यांचे पथक तयार करुन मिळालेली माहीती सर्वाना दिली.
व पोलीस पाटील किन्ही सवडद यांनी दिलेल्या माहीतीची खात्री करणे कामी पोलीस स्टेशन मधुन ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक, निखिल ब.निर्मळ, पो.स्टे. अमडापुर यांनी, बिट अंमलदार मपोहेकॉ वंदना बोर्डे, पोकों प्रदीप चोपडे, पोकॉ सुनील भवटे, पोकॉ चंद्रशेखर मुरडकर, पोना सदीप वायाळ असे सरकारी वाहनाने, ग्राम किन्ही सवडद येथे गेले. किन्ही सवडत येथे गेल्यावर पोलीस पाटील, श्रीकृष्णा धंदरे यांनी श्री. महादेव त्र्यंबक चोपडे, यांचे घर दाखवीले, सदर घराची पाहणी केली, असता सदर घरामध्ये श्री. महादेव त्र्यंबक चोपडे, वय ७५ वर्ष, व सौ. कलावती महादेव चोपडे, वय ७० वर्ष, असे दोघे त्याचे घरातील लाकडी बाजीवर रक्तबंबाळ अवस्थेत मरण पावलेले दिसले, वरुन सदर घटनेची माहीती ठाणेदार निखील निर्मळ यांनी मा. पोलीस अधिक्षक साहेब, बुलडाणा, मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब, बुलडाणा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, बुलडाणा यांना देवुन सदर ठिकाणी फॉरेन्सक टिम, बुलडाणा पाचारण करण्यात आले. फॉरेन्सीक टिमच्या मदतीने घटनास्थळावर आवश्यक ते पुरावे तपास कामी गोळा करण्यात आले आहे. ठाणेदार निखील निर्मळ पो.स्टे. अमडापुर यांनी घटनेचा सविस्तर पंचनामा तयार करुन दोन्ही मृतकचे प्रेत पोष्टमॉर्टम करीता, ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे पाठवीण्यात आले.
सदर घटनेची फिर्याद श्री. प्रल्हाद महादेव चोपडे, वय ४८ वर्ष, रा. किन्ही सवडद, ता. चिखली मृतकच्या मोठ्या मुलाने दिली असुन, त्यांनी फिर्याद मध्ये नमुद केले आहे की, मृतक श्री. महादेव त्र्यंबक चोपडे, वय ७५ वर्ष, व सौ. कलावती महादेव चोपडे, वय ७० वर्ष, दोघे ही खुप रागीट होते. त्यामुळे आम्ही दोघे भाऊ त्याचे सोबत राहत नव्हतो. मृतक श्री. महादेव त्र्यंबक चोपडे, यांनी काही दिवसापुर्वी त्याचे जवळ असलेला जमीनी पैकी दिड-दिड एकर जमीन दोन्ही मुलाना बक्षीस पत्र लिहुन दिली होती व दोन एकर शेती ही मृतक सौ. कलावती महादेव चोपडे, यांचे नावे ठेवली होती. बक्षीस पत्र करुन दिल्या नंतर काही दिवसांतच मृतक महादेव चोपडे यांनी त्यांची पत्नी सौ. कलावती चोपडे यांचे नावावरील दोन एकर शेती विक्री काढली होती. सदर शेती विक्री काढल्यानंतर आरोपी गणेश महादेव चोपडे, वय ३८ वर्ष, रा. किन्ही सवडत, यांनी मृतक यांना शेती विक्री करु नका, परंतु मृतक यांनी त्याचे काही एक न
ऐकले नाही म्हणुन दिनांक २७/९/२०२५ रोजी संध्याकाळी ०५:००वाजता ते ०५:३०वाजता दरम्यान आरोपी गणेश महोदव चोपडे हा त्याचे आई वडील यांचे घरी गेला व त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला व आरोपी गणेश चोपडे यांने त्याचे वडील श्री. महादेव त्र्यंबक चोपडे, वय ७५वर्ष, व आई सौ. कलावती महादेव चोपडे, वय ७० वर्ष, यांचे डोक्यात कशानेतरी वार करुन, त्यांना जख्मी करुन, त्यांना जिवे ठार केले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन अमडापुर येथे अपराध क्रमांक ३२१/२०२५कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता २०२३नुसार गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाची घटनेची माहीती, मा. पोलीस अधिक्षक साहेब, बुलडाणा, मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब, बुलडाणा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, बुलडाणा यांना मिळताच सदर घटनास्थळी लागलीच , मा.श्री. अमोल गायकवाड साहेब, अपर पोलीस अधिक्षक साहेब, बुलडाणा, मा. श्री. सुधीर पाटील साहेब, उपविभागीयपोलीस अधिकारी साहेब, बुलडाणा यांनी भेट देवुन घटेची माहीती घेवुन, गुन्हयाचे तपाससंदर्भात मार्गदर्शन केले आहे.
सदर गुन्हयातील आरोपी गणेश महादेव चोपडे, वय ३८ वर्ष, रा. किन्ही सवडत, ता.चिखली, जि. बुलडाणा यांस अटक करुन, मा.प्रथम वर्ग कोर्ट, चिखली येथे हजर केले असता नमुद आरोपीचा पोलीस कंस्टडी रिमांड मंजुर केला असुन सदर आरोपी संध्या पोलीस स्टेशन अमडापुर येथे पोलीस कंस्टडी मध्ये असुन, सदर गुन्हयाचा पुढील तपास मा.श्री.निलेश तांबे, पोलीस अधिक्षक साहेब, बुलडाणा,, मा.श्री. अमोल गायकवाड साहेब, अपर पोलीस अधिक्षक साहेब, बुलडाणा, मा.श्री. सुधीर पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, बुलडाणा, मा.श्री. सुनील अंबुलकर, पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा, बुलडाणा, यांचे मार्गदर्शनाखाली, ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक, निखिल ब. निर्मळ, पो.स्टे. अमडापुर, व पो.स्टाफ करीत आहे.

You may have missed

error: Content is protected !!