कर्तुत्ववान महिलांचा, “सन्मान नवदुर्गांचा” पुरस्कार देऊन, मा जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने सत्कार”
“
.
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज) शोषित पीडित घटकांसाठी विविध काम करणारी संस्था मा जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुर्गोत्सवानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
घर आणि कर्तव्य सांभाळून सामाजिक उन्नती मध्ये विशेष योगदान देणाऱ्या कर्तुत्वान महिलाना पुरस्कार देऊन त्यांचे मनोबल वाढविणे आणि त्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना प्रेरणा मिळावी ऊर्जा मिळावी म्हणून मा जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने सन्मान नवदुर्गांचा हा पुरस्कार कर्तृत्ववान महिलांना दरवर्षी दिला जातो.

बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचारी, बुलढाणा पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस आणि विविध क्षेत्रात धडाडीने काम करणाऱ्या महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्वतंत्र कामगार संघटना चे जिल्हाध्यक्ष रमेश राजपूत, मा जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई बोराडे, बुलढाणा पोलीस स्टेशन मधील कर्तुत्वान महिला पोलीस अधिकारी कोकीलाताई तोमर यांच्या हस्ते महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मा जिजाऊ फाउंडेशन ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी सातत्याने काम करत आहे त्याचाच एक भाग म्हणून हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो अशा भावना मा जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई बोराडे यांनी व्यक्त केल्या.
