श्री बालाजी महाराज उत्सवांसाठी महिला स्वयंसेविका सज्ज…

IMG-20250929-WA0070

सिंदखेडराजा (अनिल दराडे )
जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरामध्ये श्री बालाजी महाराजांच्या विविध उत्सवांना सुरुवात झाली आहे. मंडपोत्सव, पालखी मिरवणूक, लळितोत्सव तसेच इतर उत्सवांची तयारी जोमात सुरू आहे. हे उत्सव साजरे करताना यामध्ये मानकरी व भाविक आपले योगदान देत असतात.
राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव तसेच परिसरातील महिलांच्या पुढाकारातून तीन वर्षांपूर्वी देऊळगावराजा शहर व ग्रामीण भागातील महिला स्वयंसेविकांच्या उत्सव काळातील सेवाकार्यास सुरुवात झाली आणि वर्षागणिक त्यास वाढता प्रतिसाद मिळत आहे. महिला स्वयंसेविकांच्या सेवाकार्याबाबतची यावर्षीची नियोजन सभा दि. २६ सप्टेंबर रोजी श्री बालाजी संस्थानच्या भक्तनिवासात पार पडली आहे
. स्वयंसेविकांचा समूह आठ गटांमध्ये विभागला असून प्रत्येक गटामध्ये गटप्रमुखासह प्रत्येकी १५ महिला याप्रमाणे एकूण १२० महिला सेवारत आहेत. सकाळी ७ ते रात्री ११ आई पर्यंत प्रत्येक दोन तासासाठी एक गट याप्रमाणे एकूण सोळा तास वरील ८ गट सेवा देण्यासाठी तत्पर आहेत.
या स्वयंसेविकांच्या माध्यमातून मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे, मंदिर परिसरामध्ये दर्शन रांगा व्यवस्थित राहतील यासाठी भाविकांना सूचना देणे, मंडपोत्सवातील लाटांजवळ स्वच्छता ठेवणे,भाविकांना अन्नछत्रातील सेवा देणे यासह चप्पल स्टॅन्ड सेवा आणि इतर सेवाकार्य केले जाते. वरील बाबींसाठीचे तसेच स्वच्छतेसाठीचे सर्व साहित्य पुरवण्याचे कार्य श्री बालाजी संस्थानचे कर्मचारी करीत असतात.
स्वयंसेविकांनी स्वतःसाठी एक ड्रेस कोड ठरवून घेतला असून ऑरेंज साडी व ओळखपत्र त्या परिधान करतात.उत्सव संपल्यानंतर ओळखपत्र श्री बालाजी संस्थान कार्यालयात जमा केले जाते.महिला स्वयंसेविका हे सेवाकार्य अतिशय निष्ठेने, भक्तीभावाने व सातत्याने करीत असून, उत्सव काळात ते सर्वांना जाणवत आहे. या स्वयंसेविकांचे परिसरातील नागरिकांनी दरवर्षी कौतुकच केले आहे. श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनीही महिलांच्या या सेवावृत्तीची दखल घेऊन त्यांची मनापासून प्रशंसा केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!