राहेरी वळण मार्गांवरील पुलाची एस. डी. ओ. याच्याकडून कडून पाहणी.तात्काळ दुरुस्तीचे काम करून रस्ता सुरु करण्याचे निर्देश
.सिंदखेडराजा (अनिल दराडे )
संत चोखा सागर (खडकपूर्णा प्रकल्प) च्या १९ वक्रद्वारांमधून रविवारी पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आल्याने खडकपूर्णा नदीला पूर आला होता. त्याचवेळी या परिसरात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे राहेरी येथील नवा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती. पूर ओसरल्यानंतर नवीन पूल एका बाजूने वाहून गेल्याचे समोर आले. आज या पुलाला सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी राहेरी येथील पुलाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी अभियंता एस.आर. देशमुख, ग्राम महसूल अधिकारी श्री.काकड, श्री. पवार व तसेच गावचे सरपंच व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी पुलाची पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करावे. व रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल नाली घेऊन तेथील शेतकऱ्यांच्या पाण्यापासून नुकसान होणार नाही याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
