स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, पोस्टे. मेहकर हद्दीत पकडला “1.43 कोटीचा गुटखा” जिल्ह्यातील सर्वात मोठी गुटखा कारवाई., ट्रक चालकांसह 03 आरोपी अटकेत.
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज)महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंध केलेला, मानवी आरोग्यास अत्यंत हानीकारक गुटखा व तत्सम सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थाची विक्री, वाहतूक, साठवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेवून त्यांचेवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. सदर अनुषंगाने पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस स्टाफचे स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अवैध गुटखा संबंधाने कारवाई करणेबाबत सुचित केल्या आहे पो.स्टे. मेहकर हद्दीत दि.30/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा संबंधाने कारवाई केली.

सविस्तर वृत्त असे की दि.30/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती त्याच ताब्यातील अशोक लेलैंड कंपनीच्या 02 ट्रकमध्ये शासन प्रतिबंधीत सुगंधीत पान मसाला व गुटक्याची वाहतूक करीत आहेत ही माहिती मिळताच पो.स्टे. मेहकर हद्दीत समृध्दी महामार्गावरील फर्दापूर टोलवर स्था.गु.शा.च्या पथकाने सापळा रचून, माहिती प्रमाणे गुटखा व सुगंधीत पान मसाला भरलेले 02 अशोक लेलैंड कंपनीचे ट्रक पकडून त्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये दोन ट्रक चालकांसह 03 व्यक्तींना पकडून, त्यांच्या ताब्यातून गुटखा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी विरुध्द पो.स्टे. मेहकर येथे भा.न्या.सं.चे कलम 274,275,223,123 सह अन्न व सुरक्षा माणके कायदा 2006 चे कलम 26,27,59 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. मेहकर करीत आहेत.
यामधील पकडलेले आरोप
मोहम्मद इम्रान मो. हफिज वय 28 वर्षे, रा. बियाबानी मोहल्ला, अचलपूर जि. अमरावती.
अजीम बेग हाफिज बेग वय 36 वर्षे, रा. अन्सारनगर, अमरावती.
एजाज अहेमद अजीज अहेमद वय 31 वर्षे, रा. शिरजगांव ता. चांदूरबाजार जि. अमरावती (दि.30.09.2025) हे असून यांच्याजवळ मुद्देमाल
गुटखा 264 पोते किं. 1,13,09,760/-रुपये,
अशोक लेलैंड कंपनीचे 02 ट्रक किं. 30,00,000/-रुपये.
एकूण- 1,43,09,760/-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी मा. श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्री. अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा मार्गदर्शनाखाली पोनि, श्री. सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. प्रताप बाजड, अविनाश जायभाये, पोहेकॉ. शरद गिरी, दिपक लेकुरवाळे, पुरुषोत्तम आघाव, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोकॉ. निलेश राजपूत, मपोकॉ. पूजा जाधव, चापोहेकॉ. समाधान टेकाळे नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा, पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. ऋषीकेष खंडेराव तांत्रिक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांचे पथकाने केली.
