चक्क जिल्हा परिषदेच्या टावरवर बसून दोघाजणांनीनी चालू केले आंदोलन…..
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)मेहकर तालुक्यातील भोसा ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार करण्यात आलेला होता आणि याची तक्रार ही संजय करवते व सचिन जाधव यांनी केली होती. या तक्रारीवर कोणत्याही प्रकारचा मार्ग निघत नसल्यामुळे त्यांनी आज जिल्हा परिषद मध्येच टावर चढून आंदोलन चालू केलेले आहे आणि त्यांच्याजवळ पेट्रोल ने भरलेल्या बाटल्या सुद्धा आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही त्या ठिकाणी पोलीस प्रशासन व जिल्हा परिषदेचे अधिकारी पोचले आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात व ठाणेदार रवी राठोड यांनी आंदोलन करताना खाली उतरण्याचे आव्हान देखील करण्यात आलेले आहे.
