बुद्ध विहारातून भावी पिढी घडली पाहिजे ..उपविभागीय अधिकारी प्रा .खडसे …
सिंदखेडराजा (अनिल दराडे )
तालुक्यातील सावंगी टेकाळे येथे विश्वशांती बुद्ध विहाराला उपविभागीय महसूल अधिकारी सिंदखेडराजा ( S.D.O )प्रा. संजय खडसे यांनी भेट दिली या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते , या बुद्ध विहारामधून भावी पिढी निर्माण झाली पाहिजे आपल्या विहारामध्ये
बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे 20 ते 21 वर्षापासून आपण वर्षा वासामध्ये ग्रंथाचे पठण करता श्रवण करता मला खरोखर आनंद होत आहे . मोठे बौद्ध विहार आपण बांधले आणि या मधील तथागतांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला मला नतमस्तक होता आले हे माझं मी भाग्य समजतो कारण तथागतांची मूर्ती 1971 आणि माझा जन्म 74 चा आहे .
पुढे बोलताना त्यांनी ग्रंथामध्ये
काही बाबी सांगितल्या ,त्या मध्ये आपले आचरण आपण चांगले आणि.स्वच्छ ठेवले पाहिजे , एकमेकाबद्दल द्वेष नसला पाहिजे ,जो जन्माला आला तो मरणारच आणि दुःख होणारच आपण त्या तून मार्ग काढला पाहिजे आपण रडत बसण्या पेक्षा लढले पाहिजे आपण जो आज आहे कोणा मुळे आहे ते तपासले पाहिजे आणि मागे वळून पाहिले पाहिजे .या ठिकाणी त्यांनी अंगुलि माल आणि तथागतांची गोष्ट सांगून उपस्थितांची मने जिंकली आज आपण 20 वर्षासापासून या ग्रंथाचे दरवर्षी वाचन करता याचा मला आनंद आहे पण या मधून जसे आपण ग्रंथ पठण करतो श्रवण करतो त्याच प्रमाणे या बुद्ध विहारातून भावी पिढी घडली पाहिजे असे आव्हान त्यांनी केले .दररोज सकाळी संध्याकाळी येऊन लहान मुलांनी आपण या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे . कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवराय , माँ जिजाऊ ,तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले .या वेळी सरपंच ,उपसरपंच , सदस्य , बुद्ध विहार स्मारक समितीच्या वतीने व तंटामुक्ती समिती च्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रा .संजय खडसे यांचा सत्कार करण्यात आला .सरपंच शिवाजी झोटे ,उपसरपंच दिपक बुरकुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज झोटे तर आभार बुद्ध विहार स्मारक समितीचे वामनराव झोटे यांनी मानले कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य नागरिकांची तसेच बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती .
