चोरपांग्रा येथे ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी बुद्ध मूर्तीची स्थापना…..

IMG-20251002-WA0053

बिबी ( ब्रम्हानंद वाकोडे )
लोणार तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मौजे चोरपांग्रा (वीरपांग्रा) येथे आज दिनांक २ ऑक्टोंबर २०२५ रोजी ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना निमित्त बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की मौजे चोरपांग्रा या गावचे मूळ रहिवासी असलेले मात्र नोकरीच्या निमित्ताने परभणी येथे स्थायिक झालेले उपासक आयु .रामचंद्र तुकाराम इंगळे व शोभा रामचंद्र इंगळे या दाम्पत्याने आपल्या मूळ गावी असलेल्या बौद्धविहारास बुद्धमूर्ती धम्मदान म्हणून अर्पित केली. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली याच दिनाला अनुसरून या बुद्ध मूर्ती स्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

परभणी येथील भंते यशसंघमित्र यांच्या धम्मदेशनेने सुरुवात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन मूर्ती दाते आयु .रामचंद्र इंगळे,आणि त्यांच्या पत्नी शोभाबाई इंगळे यांच्या हस्ते पुष्प धूप दीप प्रज्वलित करून बुद्ध मूर्तिचे अनावरण करण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक केशव डहाळके, कारभारी डहाळके, श्रीराम डहाळके, राहुल मानकर सर, महादेव आगलावे, मदन जायभाये सर,संतोष केंद्रे, ब्रह्मानंद वाकोडे ( पत्रकार न्यूज मराठी 24/7 , मातृभूमी, ) प्रवीण जावळे सर , ॲड. प्रवीण सदावर्ते, मिलिंद इंगळे सर, विनोद इंगळे, संतोष हिवाळे, शरद साळवे, विजय वाघ ,नागेश शेळके, केशव खंड, सागर खंड,संजय चव्हाण,
तर ज्यांच्या सहकार्याने कार्यक्रम घडवून आणला असे. प्रफुल्ल इंगळे उपसरपंच ग्रा.पं. चोरपांग्रा , सुदेश इंगळे, अण्णा साळवे, अंबादास इंगळे, भीमराव इंगळे, प्रथमेश हिवाळे,सिद्धोधन इंगळे,
अजय इंगळे, राहुल इंगळे,जनार्धन इंगळे, सिद्धोधन पाखरे,केशव इंगळे, प्रदीप इंगळे, संतोष इंगळे,तुषार इंगळे, वैभव इंगळे, पवन इंगळे, संदीप इंगळे, गुलाब इंगळे, भारत इंगळे, प्रवीण इंगळे, अमोल इंगळे, सर्व बौद्ध उपासक उपासिका सान बाल बालिका यांनी पंचशील ग्रहण करून म्हणते भंते यश संघमित्र यांच्या प्रवचनाचा लाभ घेतला . या कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक उपासिकांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडला शेवटी सरणातयगाथा घेऊन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या उपासक उपासिका आणि गावकरी यांना भोजनदान करण्यात आले सूत्रसंचालन विजय वाघ, तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल इंगळे उपसरपंच यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!