संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

IMG-20251004-WA0002

सिंदखेडराजा( अनिल दराडे) संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाला रंगत आणली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे प्राचार्य सुधाकर गोफने यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित मेहेत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी अंभोरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन घुगे सर यांनी केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करून समाजासाठी त्यांचे विचार किती उपयुक्त आहेत हे अधोरेखित केले.

या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष प्रा. बळीराम जाधव, प्राचार्य सुधाकर गोफने, घुगे सर, तोर मॅडम, पवार मॅडम, सातपुते मॅडम, अंभोरे मॅडम, काळे मॅडम यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!