एसटी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.त्वरित बस सेवा सुरू करा अन्यथा रास्ता रोको करू.. आझाद हिंद

IMG-20251004-WA0003

बुलढाणा( निलेश कोल्हे )
बुलढाणा मोताळा ते धामणगाव बढे मलकापूर ते धामणगाव अनियमित बससेवेमुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने परिसरातील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन वारंवार संबंधितांकडे मागणी केलेली आहे. परंतु अद्यापही सदर मागणी एक वर्ष होऊन पूर्ण झाली नाही. करिता आझाद हिंद च्या वतीने सदर प्रकरणात लक्ष देत संबंधितांची भेट घेत आज निवेदन सादर केले आहे.

निवेदनामध्ये मोताळा ते वडगाव खंडोपंत, फरदापुर, काळेगाव,थळ, लाल माती, किन्होला,धामणगाव बढे मार्गे जाण्यासाठी नियमित सकाळ संध्याकाळ बस सेवा सुरू करावी.ज्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सुद्धा उत्पन्नात भर होईल. यासह मलकापूर ते धामणगाव येणारी बस तपोवन या ठिकाणी थांबा देण्यात यावा. या प्रमुख मागणीसह आज तीन ऑक्टोंबर ला सायंकाळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राम व्यवहारे, तालुका उपाध्यक्ष उल्हास काकर यांच्या अध्यक्षतेत तर आझाद हिंद चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील, सार्वजनिक शिवजयंती समितीचे माजी अध्यक्ष राजेश हेलगे, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय व्यवस्थापक परिवहन महामंडळ बुलढाणा यांना निवेदन देत त्वरित बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनासोबत संबंधित गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत ने घेतलेले ठराव,केलेली मागणी सह निवेदन सोबत सादर करण्यात आले आहे.यावेळी संबंधित वाहतूक विभागाचे अधीक्षक प्रमुख यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा बैठकीच्या दरम्यान दिले.
शेतकरी व विद्यार्थ्यांचे दैनंदिन होत असलेले नुकसान पाहता आठ दिवसाच्या आत बस सेवा सुरू करावी अन्यथा आठ दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर परिसरातील नागरिक, शेतकरी,विद्यार्थी यांच्यासह आझाद हिंद शेतकरी संघटना, ग्राम स्वराज्य समिती पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी आयुष मंत्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव,आमदार संजय गायकवाड,जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक, आझाद हिंदचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, ग्राम स्वराज्य समिती संयोजक आदींना देण्यात आल्या आहेत.

You may have missed

error: Content is protected !!