युद्धपातळीवर दुष्काळी अनुदानाच्या याद्या अपलोड करणे सुरू21 कोटी रुपयाचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तहसीलदार अजित दिवटे….

IMG-20251004-WA0005


सिंदखेडराजा(अनिल दराडे ) सिंदखेडराजा तालुका सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळावे यासाठी सिनखेडराजा तहसील कार्यालयामध्ये अनुदानाची यादी अपलोड करण्याचे काम युद्ध पातळी सुरू आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा का होईना आर्थिक हातभार लागणार आहे सिंदखेडराजा तालुक्यात जवळपास 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 कोटी रुपये जमा होणार असल्याचे तहसीलदार अजित दिवटे यांनी सांगितले असून काही शेतकऱ्यांना या अनुदान दोन टप्प्यात मिळणार आहे त्यामुळे दुसरा टप्पा पैसे आले की लगेच मिळणार आहे
सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा किनगाव राजा सोनोशी दुसर बीड मलकापूर पांगरा शेंदुर्जन साखरखेर्डा या सातही मंडळात अतिवृष्टी झाली होती तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले होते त्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत होती त्यासाठी शेतावर जाऊन पालकमंत्री केंद्रीय राज्यमंत्री विद्यमान आमदार माजी आमदार यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या सरसकट तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने दिवाळीपूर्वीच अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या आदेश मिळाल्याने महसूल यंत्रणा ने युद्ध पातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे काम सुरू केले आहे तहसीलदार अजित दिवटे यांनी त्याच्या केबिनमध्ये युद्ध पातळीवर याद्या अपलोड करण्याचे काम सुरू केले आहे यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार नाय तहसीलदार डॉक्टर प्रवीण कुमार वराडे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सुनिता रोकडे ऑपरेटर गणेश देशमुख यांनी बसून याद्या अपलोड करण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे पडणार आहेत



इ केवायसी करून घ्यावी तहसीलदार अजित दिवटे
याद्या अपलोड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे याद्या अपलोड झाल्याबरोबर शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी ई किंवा झाल्याबरोबर त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होईल असे तहसीलदार अजित दिवटे यांनी सांगितले

You may have missed

error: Content is protected !!