अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस स्टेशन चिखलीमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…..

IMG-20250627-WA0003

चिखली (निलेश कोल्हे)मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील, यांच्या वतीने आदर्श विद्यालय, चिखली येथे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे तसेच जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्याचे आरोग्यावर व भविष्यावर होणारे परिणाम तसेच त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पोलीस स्टेशन चिखलीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होण्यास व अमली पदार्थांच्या विरोधात सजग राहण्याचा संदेश जनमानसात पोहचण्यास मदत होणार आहे. पोलीस स्टेशन चिखली येथे देखील अधिकारी / अंमलदार यांना शपथ देण्यात आली.
. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचे विशेष योगदान लाभले.

You may have missed

error: Content is protected !!