बुलढाणा तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या….
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज) बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.अनिल बळीराम टेकाळे(वय वर्षे ५४) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत त्यांनी आपले जीवन संपविले. अनिल टेकाळे यांच्यावर पतसंस्थेचे कर्ज होते. या कर्जाच्या विवंचनेत त्यांनी रुईखेड टेकाळे शिवारातील राजेंद्र टेकाळे यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन तपास करीत आहेत. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले असून अनिल टेकाळे यांच्या मागे आई वडील, भाऊ,पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून, तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
