शहरातील प्रलंबित कामे त्वरित सुरू करावीत — सिंदखेडराजा नगरपरिषदेकडे शासनमान्य कामे व नागरिकांच्या सुविधा तात्काळ मार्गी लावण्याची दिलीप चौधरी यांची मागणी…

IMG-20250830-WA0009

सिंदखेडराजा (अनिल दराडे)
शिवसेना शेतकरी नेते (उभाठा गट) दिलीप भिकाजी चौधरी यांनी दिनांक 05 ऑक्टोबर रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देत शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024 प्र.क्र. 87(30) का 1411, दिनांक 14 ऑक्टोबर 2024 अंतर्गत मंजूर पाच कोटी दहा लाख रुपयांच्या कामांना त्वरित सुरुवात करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, “या मंजूर कामांची टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून तात्काळ सुरू करावी. मी यापूर्वी 22 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. 30 सप्टेंबरपर्यंत काम सुरू न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून अन्नत्याग उपोषण सुरू करणार असल्याची सूचना दिली होती. मात्र दसरा सणामुळे उपोषणाची तारीख पुढे ढकलून 6 ऑक्टोबर 2025 रोजी अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात येईल,” असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांनी नगरपरिषदेवर आरोप केला की, “दहा पैकी आठ टेंडर राजकीय वादामुळे रद्द करण्यात आली आहेत. काही अर्जदारांच्या टेंडरमध्ये त्रुटी काढून हेतुपुरस्सर टेंडर रद्द केल्याची माहिती मिळत आहे. जर मंजूर निधी परत गेला, तर याची जबाबदारी प्रशासनावर राहील.”

शहरातील नागरिकांच्या समस्या मांडताना चौधरी यांनी पुढे म्हटले आहे की, सिंदखेडराजा शहरात जलजीवन योजनेसाठी 29 कोटी रुपये खर्च झाले असले तरीही पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही. महालक्ष्मी रेसिडेन्सी परिसरात गेल्या 15 दिवसांपासून पाईपलाईन फुटली असून ती त्वरित दुरुस्त करावी. तसेच शहराला चौथ्या दिवशी नियमित पाणीपुरवठा करावा, नगरपरिषद मजुरांचे थकित वेतन तत्काळ द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यासोबतच चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा मुद्दाही उपस्थित केला. सिंदखेडराजा शहरातील 80 टक्के जनता शेतकरी असून त्यांना शेतरस्त्यांची मोठी समस्या भेडसावत आहे. निवेदनात विविध शेतरस्ते मंजूर करून त्यांची त्वरित कामे सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.


📋 मंजूर कामांची यादी (मुख्य मुद्दे)

  1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्दू हायस्कूलजवळील सामाजिक सभागृहात विद्युत उपकरणे व साऊंडप्रूफ व्यवस्था बसवणे.
  2. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाजवळ सामाजिक सभागृह बांधकाम.
  3. शहरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण.
  4. आलापूर रोड ते रामदास केळकर यांच्या शेतापर्यंत खडीकरण.
  5. टी-पॉईंट ते पेट्रोल पंपापर्यंत स्ट्रिट लाईट व न्यायालयाजवळ हायमास्ट बसविणे.
  6. शहराला चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन.
  7. मजुरांचे थकित पगार तत्काळ देणे.
  8. जुन्या पाईपलाईनच्या जागी नवीन पाईपलाईन टाकणे.
  9. विविध शेतरस्त्यांची बांधणी व दुरुस्ती करणे.
  10. ग्रामीण योजनांप्रमाणे शहरातील शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा.

You may have missed

error: Content is protected !!