स.व.प.हायस्कूल,लोणार मध्ये शिक्षक पालक संघाची सभा संपन्न!
लोणार (यासीन शेख)सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार या ठिकाणी आज दिनांक 4/10/2025 रोजी शिक्षक पालक संघाची सभा आयोजित करण्यात आली त्यानिमित्ताने आज येथे सखी सावित्री समितीची सुद्धा घोषणा करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर.बी डोळे सर तर प्रमुख उपस्थितीमध्ये स.व.प.स्मारक शिक्षण समिती लोणार चे अध्यक्ष ऍडवोकेट भास्करराव सांगळे,उषाताई फड संचालिका ज्ञानदीप कॉन्व्हेंट लोणार,नंदकिशोर सांगळे हे उपस्थित होते यासोबत महिला तक्रार निवारण समिती प्रतिनिधी डॉ. सोनाली मुंदडा व डॉ. अनिता नागरे याही मंचावर आवर्जून उपस्थित होत्या तर पालक प्रतिनिधी शिवदास वऱ्हाडे व शेख यासीन (पत्रकार) हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नखाते सरांनी तालुक्यात नेहमी यशाची परंपरा आमच्या शाळेने सतत राखून ठेवली असून शिक्षण,क्रीडा माध्यमातून शाळेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उंचवत आहे. संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब यांनी शाळेला विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या स्वच्छ फिल्टरचे पाणी, ग्राउंड स्वच्छ करून गट्टू लावणे, सोलर पॅनल, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक खोलीत प्रवेशद्वार वर क्रीडांगणामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. काकासाहेब यांच्या उपस्थितीत सुंदर असे गार्डन निर्माण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख मार्गदर्शक समितीचे अध्यक्ष ऍडवोकेट भास्करराव सांगळे यांनी सांगितले सर्वांगीण विकास करण्याचा माझा स्वप्न नाही तर अण्णा साहेबांचा स्वप्न आहे तो साकारण्याची जबाबदारी माझ्याकडे तुम्ही माझी ताकद प्रेरणा आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याच्या एका प्रामाणिक हेतूने सुरू झालेली संस्था आज चांगल्या प्रगतीपथावर आहे आपल्या सहकार्याची व आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपल्या अडचणी आम्हापर्यंत कळवा आम्ही ते सोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक डोळे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडविण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने आपण आमच्याकडे दिली ती जबाबदारी पूर्ण करतांना यावर सर्वांगीण चर्चा घडण्यासाठी आज पालक शिक्षक सभेचे आयोजन करत आले असल्याचे त्यांनी सांगितले. तर आपल्या 81व्या वयात जो सहकार्य काका साहेबांकडून मिळत आहे त्यांच्या या सहकार्य व मार्गदर्शनाने निश्चित आम्ही संस्थेचे नाव आणखी उंच शिखरावर नेऊ असे म्हणाले. यानंतर महिला तक्रार निवारण समिती प्रतिनिधी डॉ. सोनाली मुंदडा व डॉ. अनिता नागरे व पालक प्रतिनिधी शिवदास वराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता आघाव यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण इंगळे यांनी केले.संपूर्ण कार्यक्रम नियोजनाची तयारी प्रभारी विजय जागृत यांनी केली.
